पुणे : भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन एकदिवसीय आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ नवीन वर्षाची सुरुवात करणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेला मंगळवारपासून सुरुवात होणार आहे.
उभय संघांमधील पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली यांच्या अनुपस्थितीत पुन्हा एकदा हार्दिक पांड्यावर मोठी जबाबदारी आली आहे. हार्दिक पंड्या नवीन वर्षात अनेक नव्या खेळाडूंसह मायदेशात खेळणार आहे.
दरम्यान, टी २० मालिका ही हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात तर एकदिवसीय मालिका रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळली जाणार आहे. टी२० मालिकेत रोहित, राहुल अन् विराट देखील नसणार आहे. त्यामुळे हार्दिकच्या संघाचा कस लागण्याची शक्यता आहे.
भारत विरूद्ध श्रीलंका टी-२० मालिका
पहिला सामना, ३ जानेवारी, मुंबई – रात्री ७ वाजता
दुसरा सामना, ५ जानेवारी, पुणे – रात्री ७ वाजता
तिसरा सामना, ७ जानेवारी, राजकोट – रात्री ७ वाजता
भारत विरूद्ध श्रीलंका एकदिवसीय मालिका
पहिला सामना, १० जानेवारी, गुवाहाटी – दुपारी १.३० वाजता
दुसरा सामना, १२ जानेवारी, कोलकाता – दुपारी १.३० वाजता
तिसरा सामना, १५ जानेवारी, तिरूवअनंतपुरम – दुपारी १.३० वाजता