मुंबई : बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा हे मागच्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चर्चेत होते. चेतन शर्मांच्या स्टिंग ऑपरेशनमुळे भारतीय क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडाली होती. अखेर या स्टिंग ऑपरेशनमुळे चेतन शर्मा यांनी त्यांच्या निवड समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला असल्याची माहिती दिली आहे.
चेतन शर्मा यांची गेल्या महिन्यातच वरिष्ठ निवड समितीचे मुख्य निवडकर्ता म्हणून पुनर्नियुक्ती करण्यात आली होती. चेतन शर्मा यांनी या स्टिंग ऑपरेशनमध्ये भारतीय खेळाडूंच्या फिटनेसबाबत अनेक दावे केले होते.
तसेच त्यांनी रोहित शर्मा हार्दिक पंड्या, रोहित विराट वाद, विराट गांगुली कर्णधारपदावरून वाद या सर्व मुद्द्यांवर उघडपणे चर्चा केली होती. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने ते चांगलेच अडचणीत आले.
BCCI chief selector Chetan Sharma resigns from his post. He sent his resignation to BCCI Secretary Jay Shah who accepted it.
(File Pic) pic.twitter.com/1BhoLiIbPc
— ANI (@ANI) February 17, 2023
भारतीय क्रिकेटचे भविष्य निवडणाऱ्या शर्मा यांनी आरोप केला आहे की अनेक भारतीय क्रिकेट स्टार १००% तंदुरुस्त होण्यासाठी सामन्यांपूर्वी इंजेक्शन घेतात. तथापि, ते इंजेक्शन वेदनाशामक किंवा वैद्यकीय संघाने दिलेले नसतात. ते म्हणाले, “भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू ८०% तंदुरुस्त असतानाही इंजेक्शन घेतात आणि १००% तंदुरुस्त होतात. या इंजेक्शन्समध्ये असे औषध आहे जे डोप टेस्टमध्ये पकडले जात नाही. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ते मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडले.
दरम्यान, गेल्या २ दिवसांपासून चेतन त्यांच्या वादग्रस्त मुलाखतीमुळे चर्चेत होते आणि जय शाह या प्रकरणी कोणती पावले उचलतात याची सर्वांना प्रतीक्षा होती, कारण राष्ट्रीय निवडकर्ते बोर्डाच्या कराराला बांधील असतात आणि या अंतर्गत ते मीडियासोबत चर्चा करण्याची त्यांना परवानगी नसते. आता त्यांनी राजीनामा दिला असून बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे.