(Baramati Crime) बारामती, (पुणे) : सांगवी येथे झालेल्या खुनाचे रहस्य उलगडण्यात माळेगाव पोलिसांना यश आले असून जमिनीच्या वादातून चुलत भावानेच आपल्या भावाचा दगडाने ठेचून खून केल्याचे तपासात निषपन्न झाले आहे. याप्रकरणी आरोपीला माळेगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
विनोद हिराचंद फडतरे (वय – ३०) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर विशाल फडतरे असे खून केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार…!
बारामती तालुक्यातील सांगवी येथील विनोद फडतरे हा बुधवारी सकाळी जुना सांगवी पणदरे रस्त्यावरील शेतात आपली दुचाकी वरुन गेला होता. त्या ठिकाणी एका अज्ञात व्यक्तीने दुचाकी पाडून डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. या घटनेबाबत माळेगाव पोलिसांना माहिती देण्यात आली होती.
पोलिसांनी सदर ठिकाणची पाहणी केली तसेच पंचनामा केला. तसेच तपासाची सूत्रे हलवून माळेगाव पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तपास माळेगाव पोलीस करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Baramati Crime : बारामती तालुक्यातील सांगवी येथे तरूणाचा दगडाने ठेचून खून ; परिसरात खळबळ..!