ढाका: बाबर आझमचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बाबर आझमचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ बांगलादेश प्रीमियर लीगचा आहे. बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये एक बांगलादेशी खेळाडू बाबर आझमशी भिडला होता. यानंतर पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचाही संयम सुटला. यानंतर परिस्थिती इतकी बिघडली की मैदानावरील पंचांना हस्तक्षेप करावा लागला. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बांगलादेश प्रीमियर लीगच्या 12 व्या सामन्यात रंगपूर रायडर्स आणि दुर्दंतो ढाका हे संघ आमनेसामने होते. रंगपूरसाठी बाबर आझम सलामीला आला. ढाका संघाच्या अराफतने 13व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर बाबर आझम संघाच्या नुरुल हसनची विकेट घेतली. त्यानंतर ढाक्याचा यष्टिरक्षक इरफान सुकूरने बाबर आझमला स्लेज केले. पण बाबर आझम कुठे थांबणार होता… यानंतर दोन्ही खेळाडू समोरासमोर आले. त्यानंतर पंचांनी प्रकरण शांत केले.
WTF ???????
So,now they want a fight with him ?
Furious Babar ???? #BabarAzam???? pic.twitter.com/HKjZeXPIW1
— Sami Nadeem (@Sami_ullah_1234) January 27, 2024
बाबर आझमने शानदार खेळी केली
मात्र, या सामन्यात बाबर आझमने उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन केले. पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने 46 चेंडूत 62 धावांची खेळी खेळली. त्याने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 1 षटकार लगावला. बाबर आझमच्या संघाने 20 षटकांत 8 बाद 183 धावा केल्या. प्रत्युत्तरात ढाका संघ 16.3 षटकांत 104 धावांवर गारद झाला. अशाप्रकारे रंगपूर रायडर्सने ७९ धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला.