पुणे : भारत-पाकिस्तान लढतींमुळे सर्व क्रिकेटविश्वाचे लक्ष लागून राहिलेल्या आशिया कपला टी-20 स्पर्धेस आजपासून सुरुवात होत आहे. ‘यजमान’ श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्या लढतीने स्पर्धेचे बिगूल वाजेल.
अफगाणिस्तान-श्रीलंका संघांदरम्यान सलामीची लढत असली, तर तमाम क्रिकेटप्रेमींसाठी रविवारी स्पर्धेची सुरुवात होणार आहे. अफगाणिस्तान संघ मोहम्मद नबीच्या नेतृत्वाखाली अव्वल संघाला पराभूत करण्याचे स्वप्न बाळगून आहे. तथापि, श्रीलंका संघ खेळाडूंच्या दुखापतींनी त्रस्त आहे. त्यांचे सारेच वेगवान गोलंदाज अननुभवी असल्यामुळे, फिरकी गोलंदाजांचे यश श्रीलंकेसाठी महत्वाचे ठरेल.
ही स्पर्धा श्रीलंकेत होणार होती. परंतु तेथे मोठी उलथापालथ झाल्यामुळे स्पर्धा अमिरातीत खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. ठिकाण बदलले असले, तरी तांत्रिकदृष्ट्या श्रीलंकाच यजमान आहेत. श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांचा ब गटात समावेश आहे. यातील दोनच संघ सुपर- फोरसाठी पात्र ठरणार आहे. त्यामुळे या तिघांसाठी एकमेकांविरुद्धची प्रत्येक लढत महत्त्वाची आहे.