नवी दिल्ली : क्रिकेटप्रेमींसाठी मोठी मेजवानी ठरणाऱ्या आशिया कप 2025 (Asia Cup 2025) स्पर्धेला उद्या, 9 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. पहिला सामना अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात खेळवला जाणार आहे. दरम्यान, भारताचा पहिला सामना 10 सप्टेंबर रोजी यूएईविरुद्ध होणार असून, भारत-पाकिस्तानचा हायव्होल्टेज सामना 14 सप्टेंबरला रंगणार आहे.

भारतीय संघ :
फलंदाज : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, रिंकू सिंग
अष्टपैलू : हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल
यष्टिरक्षक : संजू सॅमसन, जितेश शर्मा
गोलंदाज : जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, हर्षित राणा

ग्रुप स्टेज वेळापत्रक :
9 सप्टेंबर : अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग
10 सप्टेंबर : भारत विरुद्ध यूएई
11 सप्टेंबर : बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग
12 सप्टेंबर : पाकिस्तान विरुद्ध ओमान
१3 सप्टेंबर : बांगलादेश विरुद्ध श्रीलंका
14 सप्टेंबर : भारत विरुद्ध पाकिस्तान
15 सप्टेंबर : श्रीलंका विरुद्ध हाँगकाँग
16 सप्टेंबर : बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान
17 सप्टेंबर : पाकिस्तान विरुद्ध यूएई
18 सप्टेंबर : श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान
19 सप्टेंबर : भारत विरुद्ध ओमान

सुपर 4 समन्यांचे वेळापत्रक :
20 सप्टेंबर : गट ब पात्रता 1 विरुद्ध गट ब पात्रता 2
21 सप्टेंबर : गट अ पात्रता 1 विरुद्ध गट अ पात्रता 2
23 सप्टेंबर : गट अ पात्रता 1 विरुद्ध गट ब पात्रता 2
24 सप्टेंबर : गट ब पात्रता 1 विरुद्ध गट अ पात्रता 2
25 सप्टेंबर : गट अ पात्रता 2 विरुद्ध गट ब पात्रता 2
26 सप्टेंबर : गट अ पात्रता 1 विरुद्ध गट ब पात्रता 1
अंतिम सामना : 28 सप्टेंबर (रविवार)
भारत आणि पाकिस्तानच्या लढतीकडे संपूर्ण आशियातील चाहत्यांचे लक्ष लागले असून, आगामी काही दिवस क्रिकेटप्रेमींसाठी थरारक ठरणार आहेत.







