Monday, October 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोघांना जामखेडमधून अटक; सहा गुन्हे उघड, ९ लाखांचा मुद्देमाल जप्त!

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 12 October 2026, 19:09

दौंड, ता. १२ : पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि दौंड पोलिसांनी चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोघांना जामखेड येथून अटक केली आहे. या कारवाईत दौंड, यवत, वडगाव निंबाळकर आणि जेजुरी पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण सहा गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपींकडून ५५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि एक मोटारसायकल असा एकूण सुमारे ९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दीपक बलभीम पवार (वय २८, रा. आरोळे वस्ती, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) आणि युवराज सचिन लोखंडे (वय २४, रा. उद्धट, ता. इंदापूर, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड पोलिस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरीच्या घटना घडल्यानंतर पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मालमत्तेविषयक गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पथकाने घटनास्थळे, गुन्ह्यांची वेळ आणि आरोपींची कार्यपद्धती यांचा अभ्यास केला. समान पद्धतीने घडलेल्या गुन्ह्यांची माहिती एकत्रित करून गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा शोध सुरू केला.

या तपासादरम्यान चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये दीपक पवार आणि युवराज लोखंडे यांचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पथकाने जामखेड येथील आरोळे वस्ती परिसरात जाऊन दोघांचा शोध घेतला आणि त्यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत केलेल्या गुन्ह्यांची माहिती उघड झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

चार पोलिस ठाण्यांतील सहा गुन्हे उघड
आरोपींच्या अटकेमुळे दौंड पोलिस ठाण्यातील दोन, यवत पोलिस ठाण्यातील दोन, वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यातील एक आणि जेजुरी पोलिस ठाण्यातील एक अशा सहा गुन्ह्यांचा तपास उघडकीस आला आहे. या प्रकरणांत सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यांसाठी वापरली गेल्याचे सांगितलेली मोटारसायकल असा सुमारे नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांच्या तपासाला महत्त्वपूर्ण यश मिळाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. आरोपींनी आणखी काही गुन्हे केले आहेत का, याबाबत पुढील तपास सुरू आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापुसाहेब धडस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर राऊत, शंकर वाघमारे, पोलीस अंमलदार सचिन घाडगे, आसिफ शोख, गुरुनाथ गायकवाड, सुभाष राऊत, राजु मोमीन, विकास कापरे, भारत मोहोळ, चेतन पाटील, अंतुल पठाण, अंकुश दळवी यांच्या पथकाने केली आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोघांना जामखेडमधून अटक; सहा गुन्हे उघड, ९ लाखांचा मुद्देमाल जप्त!

Monday, 12 October 2026, 19:09

Saswad News : बैलपोळ्याच्या मिरवणुकीत राडा! दोन गटांत हाणामारी, 11 जणांवर परस्परविरोधी गुन्हा दाखल

Monday, 12 October 2026, 19:04

उरुळी कांचन मधील बाजार मैदानात सुरू असलेल्या मटक्यावर दौंड उपविभागीय पथकाची कारवाई! 6 जणांवर गुन्हा दाखल तर 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त..

Monday, 12 October 2026, 18:57

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार होणार दुप्पट? ८व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट समोर; काय आहेत नवीन नियम?

Monday, 12 October 2026, 18:48

दादा गेल्यानंतरची पहिलीच निवडणूक! सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवारांच्या पॅनेलची आघाडी; बंडखोर पुरुषोत्तम जगताप दीड हजार मतांनी पिछाडीवर

Monday, 12 October 2026, 18:23

पुणेकरांनो सावधान! गुरुवारपासून शहराचा पाणीपुरवठा आठवड्यातून एक दिवस पूर्णपणे बंद; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचा निर्णय

Monday, 12 October 2026, 18:14
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp