Monday, October 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Saswad News : बैलपोळ्याच्या मिरवणुकीत राडा! दोन गटांत हाणामारी, 11 जणांवर परस्परविरोधी गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 12 October 2026, 19:04

सासवड, ता. १२ : बैलपोळ्याच्या मिरवणुकीत नाचताना धक्का लागल्याच्या कारणावरून सुरू झालेल्या वादाचे पर्यवसान दोन दिवसांनंतर जोरदार हाणामारीत झाले. पुरंदर तालुक्यातील पवारवाडी येथील चंदनटेकडी परिसरात रविवारी (ता. ११) रात्री नऊच्या सुमारास मंदार पवार यांच्या कार्यालयात दोन गट आमनेसामने आले. या वेळी कोयता, लोखंडी गज, लोखंडी सळई, लाकडी दांडके आणि दगडांचा वापर करून परस्परांना मारहाण करण्यात आल्याचे दोन्ही बाजूंच्या फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेत दोन्ही गटांतील अनेक जण जखमी झाले असून, सासवड पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार (ता. १०) रोजी बैलपोळ्यानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत नाचताना धक्का लागल्याच्या कारणावरून आर्यन प्रविण पवार आणि सोहम दत्तात्रय पवार यांच्यात वाद झाला होता. या वादातून दोन्ही कुटुंबांमध्ये तणाव निर्माण झाला. रविवारी या वादाचे पडसाद उमटले आणि प्रकरण थेट मारहाणीपर्यंत पोहोचले.

आशिष ज्ञानदेव पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवारी दुपारपासूनच आर्यन पवार आणि तन्मय पवार यांच्याकडून त्यांच्या पुतण्या सार्थक याला फोन करून शिवीगाळ व धमक्या दिल्या जात होत्या. त्यानंतर सायंकाळी वाद मिटवण्यासाठी मंदार पवार यांच्या कार्यालयात येण्यास सांगण्यात आले. त्यानुसार रात्री नऊच्या सुमारास आशिष पवार, त्यांचे भाऊ दत्तात्रय पवार, पुतणे सोहम व सार्थक आणि मुलगा आदित्य असे कार्यालयात गेले.

तेथे आर्यन प्रविण पवार, प्रविण महादेव पवार, प्रल्हाद महादेव पवार आणि तन्मय प्रल्हाद पवार उपस्थित होते. या वेळी आर्यन आणि तन्मय यांच्या हातात लोखंडी गज व कोयता असल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. वाद मिटवण्याचा प्रयत्न सुरू असताना संबंधितांनी शिवीगाळ करून दगड, लोखंडी गज आणि कोयत्याने मारहाण केल्याचे आशिष पवार यांनी तक्रारीत म्हटले आहे.

 

या मारहाणीत आशिष पवार यांच्या डाव्या हाताला व उजव्या कंबरेवर कोयत्याने वार झाल्याचे, तर सार्थक पवार याच्या डाव्या हाताला व पाठीवर लोखंडी गजाने मार लागल्याचे फिर्यादीत नमूद आहे. आदित्य पवार याच्या उजव्या हाताला दुखापत झाली, तर सोहम पवार यालाही मार लागल्याचे सांगण्यात आले. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या धनंजय पवार यालाही दगडाने मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे.

दुसऱ्या गटाचीही परस्परविरोधी तक्रार
दरम्यान, तन्मय प्रल्हाद पवार यांनीही सासवड पोलिस ठाण्यात स्वतंत्र फिर्याद दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, रविवारी रात्री ते आणि आर्यन पवार हे मंदार पवार यांच्या कार्यालयात बसले असताना दत्तात्रय पवार, गौरव संजय पवार, आशिष ज्ञानदेव पवार, सोहम दत्तात्रय पवार, सार्थक सुनिल पवार, आदित्य आशिष पवार आणि सत्यम संपत पवार हे तेथे आले.

या वेळी गौरव पवार याच्या हातात कोयता, आशिष व धनंजय पवार यांच्या हातात लोखंडी सळई, तर दत्तात्रय पवार याच्या हातात लाकडी दांडके असल्याचा आरोप तन्मय पवार यांनी केला आहे. आशिष पवार यांनी आर्यन याच्याशी वाद घालत शिवीगाळ सुरू केली आणि त्यानंतर लोखंडी सळईने मारहाण केल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

भांडण सोडवण्यासाठी गेले असता जमलेल्या लोकांनी लोखंडी सळई, लाकडी दांडके आणि कोयत्याने मारहाण केल्याचा आरोप तन्मय यांनी केला. गौरव पवार याने कोयत्याच्या उलट्या बाजूने डोक्यात मारल्याने डोक्यातून रक्त येऊ लागल्याचेही त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. त्यानंतर त्यांचे वडील घटनास्थळी आले आणि संबंधित लोक दुचाकींवरून निघून गेल्याचे तन्मय यांनी सांगितले.

पोलिसांकडून तपास सुरू
दोन्ही गटांतील जखमींनी पोलिस ठाण्यात धाव घेतल्यानंतर त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात जाण्याची सूचना देण्यात आली. उपचार घेतल्यानंतर दोन्ही बाजूंनी तक्रारी दाखल केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. बैलपोळ्याच्या मिरवणुकीतील किरकोळ वादातून सुरू झालेल्या या प्रकरणाने गंभीर स्वरूप धारण केल्याने पवारवाडी परिसरात चर्चेला उधाण आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सासवड पोलिस ठाण्याचे पोलीस हवालदार सय्यद करीत आहेत.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोघांना जामखेडमधून अटक; सहा गुन्हे उघड, ९ लाखांचा मुद्देमाल जप्त!

Monday, 12 October 2026, 19:09

Saswad News : बैलपोळ्याच्या मिरवणुकीत राडा! दोन गटांत हाणामारी, 11 जणांवर परस्परविरोधी गुन्हा दाखल

Monday, 12 October 2026, 19:04

उरुळी कांचन मधील बाजार मैदानात सुरू असलेल्या मटक्यावर दौंड उपविभागीय पथकाची कारवाई! 6 जणांवर गुन्हा दाखल तर 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त..

Monday, 12 October 2026, 18:57

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार होणार दुप्पट? ८व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट समोर; काय आहेत नवीन नियम?

Monday, 12 October 2026, 18:48

दादा गेल्यानंतरची पहिलीच निवडणूक! सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवारांच्या पॅनेलची आघाडी; बंडखोर पुरुषोत्तम जगताप दीड हजार मतांनी पिछाडीवर

Monday, 12 October 2026, 18:23

पुणेकरांनो सावधान! गुरुवारपासून शहराचा पाणीपुरवठा आठवड्यातून एक दिवस पूर्णपणे बंद; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचा निर्णय

Monday, 12 October 2026, 18:14
Next Post

चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोघांना जामखेडमधून अटक; सहा गुन्हे उघड, ९ लाखांचा मुद्देमाल जप्त!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp