पुणे : पाकिस्तानने हाँगकाँगवर काल दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयामुळे पाकिस्तान संघ सुपर ४ साठी पात्र ठरला आहे. त्यामुळे सुपर ४ मध्ये पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान लढतीचा थरार उद्या रविवारी (ता.३) रंगणार आहे.
टीम इंडियाने आशिया कपमध्ये दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर रविवारी (ता. २८ ऑगस्ट) झालेल्या सामन्यात भारतीय संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ५ विकेट राखून पराभव केला. आशिया चषक स्पर्धेसाठी दोन गट बनवण्यात आले आहे. या दोन्ही गटांमध्ये प्रत्येकी तीन संघांचा समावेश करण्यात आला आहे. या तिन्ही संघांचे प्रत्येकी दोन सामने साखळी फेरीत खेळवण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रत्येक संघाला एकमेकांबरोबर खेळण्याची संधी मिळेल.
या साखळी फेरीनंतर सुपर-४ ही फेरी खेळवण्यात येणार आहे. साखळी फेरीत जे दोन संघ जास्त विजय मिळवतील किंवा तिन्ही संघांनी जर प्रत्येकी एक विजय मिळवला तर रनरेटनुसार हा निर्णय घेण्यात येईल. त्यानुसार पाकिस्तानने हाँगकाँगवर काल दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयामुळे पाकिस्तान संघ सुपर ४ साठी पात्र ठरला आहे.
दरम्यान, क्रिकेट चाहत्यांना सुपर ४ मध्ये भारत-पाकिस्तानच्या लढतीची उत्सुक्ता आहे. दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय मालिका होत नाहीत. त्यामुळे क्वचितच दोन्ही संघ आमने-सामने येतात. आशिया कपच्या निमित्ताने आठवड्याभरात दुसऱ्यांदा हे घडणार आहे.
सुपर ४ मध्ये प्रवेश करणारे संघ
ग्रुप ए : भारत आणि पाकिस्तान
ग्रुप बी : अफगाणिस्तान आणि श्रीलंका
सामन्याचे वेळापत्रक
३ सप्टेंबर- श्रीलंका vs अफगानिस्तान (शारजाह)
४ सप्टेंबर- भारत vs पाकिस्तान (दुबई)
६ सप्टेंबर- भारत vs श्रीलंका (दुबई)
७ सप्टेंबर- पाकिस्तान vs अफगानिस्तान (दुबई)
८ सप्टेंबर- भारत vs अफगानिस्तान (दुबई)
९ सप्टेंबर- श्रीलंका vs पाकिस्तान (दुबई)