पणजी : रणजी चषक स्पर्धेत अर्जुन तेंडुलकरने गोवा संघाकडून पदार्पण केले असून त्याचा समावेश प्लेयिंग ११ खेळाडूंमध्ये करण्यात आला आहे. कालपासून सुरु झालेल्या गोवा राजस्थान यांच्या दरम्यानच्या लढतीत अर्जुनने गोवा संघाचे प्रतिनिधित्व केले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा अर्जुनने ४ धावांवर खेळात होता.
भारताचा मास्तर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन आतापर्यंत मुंबई संघाकडून विविध स्पर्धांमध्ये खेळत होता. मात्र त्याला रणजी स्पर्धेसाठी मुंबई संघाकडून पदार्पणाची संधी मिळत नव्हती. यासाठी अर्जुनने ऑगस्ट महिन्यातच मुंबई क्रिकेट संघटनेला दुसऱ्या संघातून खेळण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र मिळावे, यासाठी अर्ज केला होता. मुंबई क्रिकेट संघटनेने अर्जुनाचा अर्ज मान्य करताना त्याला दुसऱ्या संघाकडून खेळण्याची संधी दिली.
रणजी मोसमाच्या गोवा राजस्थान सामन्यात गोवा संघाने २३ वर्षीय अर्जुनला अंतिम ११ खेळाडूंमध्ये खेळण्याची संधी दिली. काल अर्जुनने १२ चेंडूचा सामना करताना ४ धावांची नाबाद खेळी केली होती. गोवा संघाने ५ बाद २१० धावांपर्यंत मजल मारली असून गोव्याचा सुयश सध्या ८१ धावांवर खेळात आहे.
मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व अर्जुन मागील दोन वर्षांपासून करत आहे. मात्र त्याला अंतिम ११ खेळाडूंमध्ये खेळण्याची संधी मिळली नाही. मुंबई इंडियन संघाने अर्जुन सोबत पहिल्या सत्रासाठी २० तर दुसऱ्या सत्रासाठी ३० लाख रुपयांचा करार केला होता.