मुंबई: टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या घरात छोट्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. त्याची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने एका मुलाला जन्म दिला आहे. किंग कोहली पुन्हा एकदा पिता झाला आहे. माजी कर्णधाराने मंगळवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. फलंदाज विराट कोहलीने त्याच्या इन्स्टा हँडलवरून सांगितले की, 15 फेब्रुवारीला त्याच्या पत्नीने एका मुलाला जन्म दिला, ज्याचे नाव ‘अकाय’ असं ठेवण्यात आले आहे.
विराट-अनुष्काने पोस्ट शेअर करत लिहिलं आहे,”आम्हाला कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे की,15 फेब्रुवारी 2024 रोजी आम्ही आमच्या दुसऱ्या बाळाचं अर्थात वामिकाचा लहान भाऊ ‘अकाय’चं स्वागत केलं आहे. आमच्या आयुष्यातील या गोड क्षणादरम्यान आम्हाला तुमच्या शुभेच्छा हव्या आहेत. कृपया आमच्या गोपनीयतेचा आदर करा. प्रेम आणि कृतज्ञता”.
2017 मध्ये अनुष्कासोबत लग्न:
विराट कोहलीने 2017 मध्ये अनुष्का शर्मासोबत लग्न केले. दोघांनी लग्नाआधी बराच काळ एकमेकांना डेट केले होते. 2021 मध्ये दोघांनी एका सुंदर मुलीला जन्म दिला. विराट आणि अनुष्काच्या मुलीचे नाव वामिका आहे. विराट सध्या भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेचा भाग नाही. वैयक्तिक कारणांमुळे त्याने या मालिकेतून रजा घेतली आहे. या अनुभवी फलंदाजाने भारतासाठी 113 कसोटी, 292 एकदिवसीय आणि 117 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने अनुक्रमे 8848, 13848 आणि 4037 धावा केल्या आहेत.
अनुष्का-विराटच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा शुभेच्छांचा वर्षाव
अनुष्का-विराटच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. नेटकऱ्यांसह क्रिकेटर आणि बॉलिवूड सेलिब्रिटींनीदेखील कमेंट्स करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram