पुणे : १६ ऑक्टोबर पासून ऑस्ट्रेलियात सुरू होणाऱ्या ICC T20 World Cup 2022 साठी भारतीय संघाची घोषणा नुकतीच झाली. संघात जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल यांनी पुनरागमन केले आहे. तर जखमी जडेजाच्या जागी अक्षर पटेलला संधी मिळाली आहे.
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने आशिया कप झाल्यानंतरच संघ जवळपास ९५ टक्के निश्चित झाला असल्याचे सांगितले होते. त्या प्रमाणे आशिया कपमध्ये खेळलेल्या संघात फारसा बदल नाही. भारतीय संघ ५ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाला रवाना होईल.
टी २० विश्वचषकाचे सामने १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहेत, संपूर्ण स्पर्धेत भारत एकूण पाच सामने खेळणार आहे. पहिला सामना २३ ऑक्टोबर रोजी पाकिस्तान विरुद्ध, २७ ऑक्टोबर रोजी अ गटातील उपविजेत्यासह दुसरा, ३० ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा, त्यानंतर चौथा सामना २ नोव्हेंबर रोजी बांगलादेशशी आणि पाचवा सामना ६ नोव्हेंबर रोजी गट ब विजेत्यासह होईल.
???? NEWS ????: India’s squads for ICC Men’s T20 World Cup 2022, Australia & South Africa T20Is announced. #TeamIndia | #T20WorldCup | #INDvAUS | #iNDvSA
More Details ????https://t.co/ZFaOXlmduN
— BCCI (@BCCI) September 12, 2022
ICC T20 विश्वचषकासाठी असा असणार भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
राखीव खेळाडू
मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर.
ऑस्ट्रेलिया टी-20 साठी भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मो. शमी, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.
दक्षिण आफ्रिका T20I साठी भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद. शमी, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.