पुणे : वेस्ट इंडिजचा धडाकेबाज अष्टपैलू आंद्रे रसेल याने 6IXTY स्पर्धेत सेंट किट्स आणि नेव्हिस पॅट्रिओट्स विरुद्ध एकाच षटकात सलग ६ षटकार मारण्याचा विक्रम केला आहे. त्यामुळे आंद्रे रसेल हा विक्रम करणाऱ्या अगदी मोजक्या खेळाडूंच्या यादीत समाविष्ट झाला आहे.
त्रिनबागो नाईट रायडर्सकडून खेळत असताना त्याने २४ चेंडूत ७२ धावांची अफलातून खेळी करत संघाला ३ धावांनी विजय मिळवून दिला. रसेलने सेंटर किट्स अँड नेविस पॅट्रियट्स संघाविरुद्ध सहा षटकार लगावले. आंद्रे रसेलच्या मैदानातील आतषबाजीने सामना पहायला स्टेडियम मध्ये आलेल्या प्रेक्षकांचा पैसा वसूल झाला. रसेलने त्याच्या खेळीत पाच चौकार आणि आठ षटकार ठोकले. या तुफान षटकारांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
Andre Russell SIX SIXES off consecutive SIX balls in the SIXTY tournament.
8 SIXES and 5 FOURS.@TKRiders pic.twitter.com/jBKyzqwPOj
— ????????????????????????⎊ (@StarkAditya_) August 28, 2022
आंद्रे रसेल राष्ट्रीय खेळ सोडून आता लीग खेळण्याच्या निर्णयामुळे चर्चेत आहे. आयसीसी टी -20 विश्वचषक काही दिवसावर येऊन ठेपले असताना वेस्ट इंडिज क्रिकेट संघात काही अंतर्गत वाद असल्याची चिन्हे आहेत. अशात टी -20 विश्वचषकात निवड फेरी खेळण्यासाठी वेस्ट इंडिजची तयारी फार मजबूत नसणार हीच चिन्हे आहेत.
वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डासह झालेल्या वादानंतर आंद्रे रसेल आयसीसी T20 विश्वचषक २०२१ पासून एकही सामना खेळलेला नाही. अलीकडेच, तो द हंड्रेड स्पर्धेत खेळताना दिसला. वेस्ट इंडिज क्रिकेट संघाकडे क्वालिफायर खेळण्यापूर्वी फक्त दोनच T20 सामने शिल्लक आहेत. अशावेळी वेस्ट इंडिजला प्लेइंग 11 मध्ये रसेलसारख्या अनुभवी खेळाडूची गरज आहे.