Ajit Agarkar : पुणे : भारतीय क्रिकेट बोर्डाने मुख्य निवडकर्ता म्हणून माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरकडे भारतीय संघ निवडण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बीसीसीआयने नुकतीच ही माहिती जाहीर केली. त्यामुळे आता दुसरा कपिल देव मानला जाणारा आगरकर हा भारतीय क्रिकेट संघाला मुख्य निवडकर्ता म्हणून मिळाला आहे. (Ajit Agarkar)
मंगळवारी संध्याकाळी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ही घोषणा केली. तर आगामी वनडे वर्ल्ड कपच्या अनुशंगाने ही निवड महत्वाची मानली जात आहे. तर क्रिकेट सल्लागार समितीच्या मुलाखतीनंतर आगरकरची निवड करण्यात आली आहे. तर चेतन शर्मा हे स्टिंग ऑपरेशनमध्ये अडकल्यामुळे त्यांच्या पदाचा राजीनामा फेब्रुवारी २०२३ मध्ये दिला होता. (Ajit Agarkar)
???? NEWS ????: Ajit Agarkar appointed Chairman of Senior Men’s Selection Committee.
Details ????https://t.co/paprb6eyJC
— BCCI (@BCCI) July 4, 2023
बीसीसीआयने एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये अजित आगरकर आता भारताच्या निवड समितीचा अध्यक्ष असेल, अशी माहिती त्यांनी दिली आहे. यापूर्वी आशीष शेलार हे बीसीसीआयमध्ये कोषाध्यक्ष या पदावर आहेत. त्यानंतर आता अजित बीसीसीआयमध्ये जाणारा दुसरा मराठमोळा व्यक्ती ठरला आहे. कारण आता भारतीय संघ निवडण्याची जबबादारी त्याच्यावर असणार आहे.
अजित आगकरने बराच काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे, त्यामुळे त्याला क्रिकेटचा चांगलाच अनुभव आहे. त्याचबरोबर अजित आगरकरची स्वत: ची एक भूमिका कायम राहीलेली आहे. यापूर्वी एक समालोचक म्हणूनही त्याने काम केले असल्यामुळे त्याने सध्याचे क्रिकेट जवळून पाहिले आहे. यापूर्वी निवड समिती अध्यक्षाला स्वत:ची भूमिका नसल्याचे म्हटले गेले आहे. त्यामुळे अजितची निवड करत बीसीसीआय एक सकारात्मक संदेश सर्वांना या माध्यनातून देऊ शकते. (Ajit Agarkar)
दरम्यान, अजित आगरकरने भारतासाठी २६ कसोटी, १९१ वनडे आणि ४ टी-२० सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर ३४९ आंतरराष्ट्रीय विकेट्स आहेत.