मुंबई : यंदाच्या टी20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं आहे. भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीने अंतिम सामन्यात शानदार खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. अशातच विराट कोहलीने पत्नी अनुष्का शर्मासाठी सोशल मीडियावर केलेली एक भावनिक पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे.
विराटने त्याच्या इन्टाग्रामवर अनु्ष्कासोबतच एक सुंदर फोटो शेअर करत ही पोस्ट लिहीली आहे. ‘”तुझ्याशिवाय हे काहीच शक्य झालं नसतं. हा विजय जेवढा माझा आहे, तेवढाच तुझाही आहे..’थॅंक यू आणि आय लव्ह यू… असं लिहीत विराटने अनुष्काचे आभार मानले आहेत.
विराटची अवघ्या 9 तासांपूर्वी लिहीलेली ही पोस्ट सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल झाली असून त्यावर लोकांनी प्रेमाचा आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. या पोस्टला 80 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले असून हजारो जणांनी कमेंट्स केले आहे. अनेकांनी विराट-अनुष्काच्या जोडीचं कौतुक करत प्रेम व्यक्त केलं आहे. भारतीय फलंदाज विराट कोहलीची यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपची ही शेवटची मॅच होती.