अजित जगताप
वडूज : क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यावतीने खटाव तालुक्यातील शालेय खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या वडूज येथील मैदानात पुन्हा एकदा जल्लोष पाहण्यास मिळाला.
यंदा प्रथमच दोन वर्षाच्या कालावधीनंतर शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे आयोजन छत्रपती शिवाजी हायस्कूल जुनियर कॉलेज वडूज यांनी नेटक्या पद्धतीने केले. या स्पर्धेत १३ शालेय संघांनी सहभाग घेतला.
स्पर्धकांना उत्साहित करण्यासाठी शिक्षक- पालक वर्ग तसेच विद्यार्थी यांनी गर्दी केली होती. पंच म्हणून रविराज महामुनी, आय्याज शेख संभाजी पाटोळे व इतर पंच उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक डी. एन .जाधव क्रीडा शिक्षक आर. एन. पवार,आर. एन. इंगळे, पी आर राऊत, एम. आर. गोडसे यांनी नियोजन केले होते.
या स्पर्धेचे उदघाटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब गोडसे यांनी केले. या स्पर्धेमध्ये छत्रपती शिवाजी हायस्कूल वडूजचा प्रथम क्रमांक तर अंबवडे येथील भुतेश्वर विद्यालयाने द्वितीय क्रमांक मिळवला. मुले आणि मुली अशा १४ वर्षाखालील विद्यार्थी व विद्यार्थीनी स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेमुळे खऱ्या अर्थाने मोबाईल मुक्त मैदान पाहण्यास मिळाले.
दरम्यान, दर स्पर्धा यशस्वी केल्याबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे सामाजिक कार्यकर्ते व माजी विद्यार्थी विजय शेटे, राजू फडतरे, वडूजचे माजी नगराध्यक्ष डॉ. महेश गुरव, दत्ता केंगारे, आनंदा साठे, जेष्ठ कार्यकर्ते रामभाऊ जाधव,परेश जाधव, शासकीय कनिष्ठ अभियंता व क्रिडा प्रेमी नितीन मोहिते व प्रविण जाधव तसेच पालक वर्गाने सर्व विद्यार्थी विद्यार्थिनीचे कौतुक केले.