पुणे :अभिनेता आर माधवन यांचा मुलगा वेदांतने ‘खेलो इंडिया यूथ गेम्स २०२३’ या स्पर्धेत ५ सुवर्ण आणि २ रौप्य पदके जिंकली आहेत. आपल्या मुलाची ही कामगिरी बघून माधवन प्रचंड खुश झाला असून, त्याचा आनंद ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. माधवनने वेदांतचा हातात ट्रॉफी असलेला त्या कार्यक्रमातील फोटो शेअर करत वेदांतचे अभिनंदन केले आहे.
आर माधवनने ट्विटमध्ये म्हटले आहे की, वेदांतने १०० मीटर, २०० मीटर आणि १५०० मीटरमध्ये सुवर्णपदक जिंकले, तर ४०० मीटर आणि ८०० मीटर स्विमिंगमध्ये रौप्यपदक जिंकले. दुसर्या ट्विटमध्ये आर माधवनने लिहिले आहे की, अपेक्षा फर्नांडिस आणि वेदांतसह सर्वांची कामगिरी पाहून खूप आनंद झाला आहे. त्याला खूप अभिमान वाटत आहे. असे त्याने सांगितले आहे.
वेदांतने या गेममध्ये ५ सुवर्ण आणि २ रौप्य पदक जिंकली आहेत. मुलाच्या या यशावर आर. माधवनच्या आनंदाला पारावार उरला नाही. सोशल मीडियावर सर्व खेळाडूंच्या विजयाचे अभिनंदन करताना त्यांने वेदांतसाठीही पोस्ट शेअर केली आहे.
आर माधवनने ट्विटरवर वेदांतचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तो जिंकलेले पदक आणि हातात ट्रॉफीसोबत दिसत आहे. यासोबतच माधवनने हेही सांगितले की वेदांतने कोणत्या स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे.