मुंबई : आयसीसीची टी-२० विश्वचषक स्पर्धा प्रतिष्ठित स्पर्धेमध्ये गणली जाते. मात्र, सन पुढील वर्षी होणाऱ्या या स्पर्धेसाठी आयसीसीने १६ ऐवजी २० संघांना खेळविण्याचे तसेच स्पर्धेचा फॉरमॅट बदलण्याचे निश्चित केले आहे. स्पर्धेच्या फॉरमॅटमध्ये बदल केल्याने आगामी टी २० विश्वचषक स्पर्धा अजून रंगतदार होण्याची शक्यता आहे.
टी२० विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद वेस्ट इंडिज व अमेरिका यांच्याकडे आहे. या स्पर्धेत यापूर्वी १६ संघ सहभागी होत होते. मात्र, पुढील स्पर्धेत २० संघ संघभागी होणार आहेत. त्यामुळे आता पर्यंत सुपर १२ ही स्पर्धेची मुख्य फेरी घेण्यात येणार नाही. याऐवजी प्रत्येकी ५ संघाचे ४ गट करण्यात येणार आहेत.
प्रत्येकी ५ संघ एकमेकांना गट फेरीत आव्हान देखील. यातून गुणतक्त्यात सर्वात आघाडीवर असणारे २ संघ सुपर ८ फेरीसाठी प्रवेश करतील. ४ गटांमधून ८ संघ या फेरीत सहभागी होतील. या ८ संघांना पुन्हा २ गटात विभागले जाईल. एका गटातील चार संघ पुन्हा एकमेकांना आव्हान देतील. गुणतक्त्यातील अव्वल २ संघ थेट उपांत्य फेरीत प्रवेश करतील. त्यातून विजयी होणारे संघ स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र असणार आहेत.
या फॉरमॅटमुळे गट फेरीत अनेक उलथापालथ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील वर्षी होणारी टी २० विश्वचषक स्पर्धा खऱ्या अर्थाने वेगळी असणार आहे. यामध्ये पात्रता फेरीच नसणार आहे. गतवर्षी झालेल्या स्पर्धेत १६ संघांनी सहभाग घेतला होता. त्यातील ८ संघानी थेट सुपर १२ फेरीत प्रवेश केला होता व चार संघाने पात्रता फेरीतून सुपर १२ मध्ये सहभागी झाले होते.
पुढील वर्षीच्या टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी यजमान वेस्ट इंडिज व अमेरिका हे आधीच पात्र झाले आहेत. तसेच २०२२ साली खेळलेल्या टॉप ८ संघाना स्पर्धेत थेट स्थान देण्यात आले आहे. यामध्ये भारत, इंग्लंड, पाकिस्तान, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका व नेदरलँड्स या सहा संघाचा समावेश असणार आहे. बांगलादेश व अफगाणिस्तान हे संघ देखील विश्वचषक स्पर्धेत खेळातील. मात्र शेवटच्या ८ संघाना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पात्रात फेरीचे पूर्वीचे सामने खेळावे लागणार आहेत.