युनुस तांबोळी
पुणे : कुटूंबाची गरीबीची परिस्थीती असल्याने शेतात मोलमजूरी करावी लागायची… कष्ट करून राबणारे मायेचे हात मुलांना शिक्षण देत डोक्यावरून फिरायचा, एक दिवस सोन्याचा उगेल…अशी आशा आकांशा उरी ठेवून पुन्हा कष्ट करण्यासाठी बळ आणायच. अखेर शेतकरी आई बापाच्या कष्टाच चिज झाले. जांबूत ( ता. शिरूर ) येथील ललिता रामदास कोळेकर हिने पोलिस भरती होऊन मुंबई शहर चालक, शिपाई व महाराष्ट्र सुरक्षा मंडळात शिपाई या पदांसाठी तिची निवड झाली. तिच्या निवडीने शेतीत राबणाऱ्या आई वडीलांच्या डोळ्यात आनंदाश्रु उभे राहिले.
जांबूत ( ता. शिरूर ) येथे रामदास कोळेकर व पत्नी सिताबाई कोळेकर यांचे कुटूंब शेती व्यवसाय करतात. जेमतेम शिक्षण घेतलेले आई वडील प्रसंगी मोलमजूरी करतात. तीन मुली व 1 मुलगा असा परिवार आहे. एक एकर शेती असल्याने पुरेशा भांडवला अभावी शेती व्यवसायात प्रंपच चालवणे कठीण होते. त्यामुळे तीन मुलींना देऊन मोलमजूरी करून प्रपंत उभा केला आहे. सर्वात मोठा मुलगा सोमनाथ हा मंतीमंद आहे. मोठी मुलगी प्रियंका आजही आईवडीलांना मदत म्हणून शेतावर कामाला जाते.
ललिता ही देखिल मोलमजूरी करत शिक्षण घेत होती. तिचे प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद शाळा जांबूत, जय मल्हार हायस्कूल जांबूत येथे माध्यमिक तर श्री दत्त विद्यालय पिंपरखेड येथे उच्च माध्यमिक शिक्षण, निमगाव सावा (ता. जुन्नर) येथील दिलीप वळसे पाटील कला व वाणिज्य महाविद्यालयात पदवी पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले आहे. लहान बहिन दिक्षा ही सध्या दहावीचे शिक्षण घेत आहे.
ललिता हीने शिक्षण पुर्ण झाल्यावर पोलिस भरती होऊन आई वडीलांना कुटूंबाला आर्थीक पाठबळ देण्याचे ठरविले.
त्यामुळे तिने पोलिस भरती अॅकेडमी मध्ये प्रवेश घेतला. येथे प्रशिक्षण घेतल्यानंतर परीक्षेच्या माध्यमातून तिची निवड महाराष्ट्र सुरक्षा मंडळात शिपाई पदासाठी निवड झाली. त्यामुळे तिने नानविज (ता. दौंड ) येथे ४५ दिवसाचे प्रशिक्षण पुर्ण केले आहे. त्यानंतर पोलिस भरतीसाठी दिलेल्या परिक्षेचा निकाल लागला. त्यामध्ये मुंबई शहर चालक, पोलिस शिपाई या पदावर नियुक्ती झाली आहे.
मुलींना शिक्षण देऊन मोठ करण्यासाठी प्रसंगी उपाशी दिवस काढले. पण कष्ट करण्याची जिद्द सोडली नाही. मुलीच्या या यशस्वीतेमुळे केलेले कष्ट विसरून गेले. अभ्यासू व जिद्द चिकाटीच्या जोरावर कष्ट करून शिक्षण घेत मुलीन नाव काढल…असे म्हणत आई सिताबाई हिच्या डोळ्यात आनंदाश्रु उभे राहिले. ते ती लपवू शकली नाही.
दरम्यान, तीन पदावर माझी निवड झाली. पण मला अधिकारी व्हायचय. त्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षा देत आहे. सध्या मी मुंबई शहर चालक या पदासाठी प्रशिक्षण घेणार आहे. कष्ट व जिद्दीच्या जोरावर हे यश मिळवले असून आईवडीलांचा आर्शीवाद यशस्वीतेचे खरे कारण आहे. नवोदित विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून स्पर्धा परिक्षांना सामोरे जा. असा सल्ला ललिता कोळेकर हिने दिला.