Nagar News : अहमदनगर, ता.१२ : नवरात्राच्या काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्यासोबतच ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक यादव यांनी यावेळी सांगितले.
नवरात्राच्या काळात कडेकोट बंदोबस्त
नवरात्र उत्सवाला येत्या दोन-तीन दिवसात सुरुवात होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर कोतवालीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव केडगाव देवी मंदिर या ठिकाणी बैठक घेतली. आणि पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंदिर व नवदुर्गा मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काही सूचना दिल्या आहेत.
यावेळी मंदिर ट्रस्टी, पुजारी, दुकान व पाळण्याचे मालक व कामगार तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि नगरसेवक मनोज कोतकर, नगरसेवक राहुल कांबळे, नगरसेवक गणेश नन्वरे, कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक श्याम कोतकर, पुजारी तुषार कदम, बाळासाहेब कोतकर, नवनाथ कोतकर, अजित कोतकर, आण्णा शिंदे, बंटी विरकर, भाऊ घुले, किरण बोरुडे, महेश जगदाळे, हर्षल कोतकर, अनिकेत कोतकर, बाळु शिंदे,वैभव कदम, शांतता कमिटी चे नलिनी गायकवाड व त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते.
दरम्यान, मंदिर परिसरात व भाविक येण्या-जाण्याच्या रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे लावावे, पार्किंगच्या ठिकाणी लाईटची व्यवस्था करण्यात यावी, त्यासोबतच मंदिर परिसरात अपघात होऊ नये, योग्य वाहतूक नियमन व्हावे यासाठी बॅरिकेडिग बसवावेत. मंदिर परिसरात पोलिसांकडून लक्ष ठेवले जाणार आहे. त्यासाठी टॉवर पॉईंट लावले जाणार असल्याचे यादव यांनी सांगितले.
मदतीसाठी ११२ वर संपर्क करा
नवरात्र उत्सव काळात मंदिर परिसरात बरीच गर्दी असते. याचाच फायदा घेऊन महिलांचे दागिने व इतर वस्तू चोरीला जाण्याची शक्यता असते. तसेच गर्दीच्या ठिकाणी महिला व मुलींची छेड काढण्याचेही प्रकार घडतात. असा कोणताही प्रकार घडल्यास पोलिसांच्या ११२ या हेल्पलाइन नंबर वर संपर्क साधावा.