सणसवाडी (पुणे) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या उच्च प्राथमिक (इयत्ता 5 वी) व पूर्व माध्यमिक (इयत्ता 8 वी) शिष्यवृत्ती परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. या परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवार (दि. 2 जुलै) रोजी परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. यावर्षी इयत्ता पाचवीत प्रदिशा गाडे हिने 278 गुण मिळवले आहे तर इयत्ता आठवीमध्ये तुषार ढेकळे या विद्यार्थ्याने 256 गुण मिळवून राज्याच्या यादीत झळकले आहे.
यशाची परंपरा कायम राखत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वसेवाडी यांनी इयत्ता पाचवी मध्ये जिल्हा गुणवत्ता यादीत तेरा विद्यार्थी पात्र झाले आहेत. ते पात्र विद्यार्थी पुढीलप्रमाणे पूजा बाबासाहेब खोडदे (270), सई सुरेश नितनवरे (262), तृप्ती सेवागिरी रणपिसे (262), प्रशांत गौतम सपकाळ (260), दिक्षा राजेश राव (256), शुभांगी मनोहर फड (254), दीपिकाकूंवर हरिसिंग सोळंकी (248), माहेश्वरी पंकज राठोड (246), आस्था सतीश धारे (242), मृणाली अमर रोमन (242), ओमिता रोहिदास खांबले (240), मिजना समीर पठाण (238), ऋतुजा बाळू सपकाळ (234).
गुण समान असून शिष्यवृत्ती धारक नसलेले…
अलीअसगर बैठा (234), पृथ्वीराज माधवराव हिवराळे (234), आर्यन ज्ञानेश्वर लोंढे (234)
इयत्ता आठवीमध्ये जिल्हा गुणवत्ता यादीत पात्र विद्यार्थी पुढीलप्रमाणे – विनिता लखन रायकवार (230), विश्वजीत किरण जाधव( 228), आदिती सेवागिरी रणपिसे (228), अथर्व हरिदास देवकाते (222 ), ईश्वरी प्रफुल कामटकर (214), प्रथमेश जीवन मोरे (210), स्नेहा नवनाथ गर्जे (210), सार्थक जालिंदर नागरगोजे (202), विराज आबासाहेब बुणगे (200), आदित्य अनिल गावडे (198), किरण नेताजी सुर्यवंशी (198), ओंकार रमेश वाघुले (198), प्रदीप गणपत राठोड (196), या विद्यार्थ्यांनी गुण मिळवत यश संपादन केले.
यावेळी मुख्याध्यापक संतोष गोसावी, इयत्ता पाचवीसाठी रेश्मा वाघुले, प्रतिभा नगरे, धनश्री बडे, शरीफ तांबोळी यांनी तर आठवीसाठी ज्योती कुरकुटे, अंजली कोळपकर यांनी मार्गदर्शन केले. त्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी सरपंच रुपाली दरेकर, उपसरपंच राजेंद्र दरेकर, माजी संचालक दत्ताभाऊ हरगुडे, माजी नियोजन समिती सदस्य पंडीत दरेकर, ग्रामपंचायत सदस्य ललिता दरेकर, निकिता हरगुडे, माजी उपसरपंच नवनाथ हरगुडे, संचालक बाळासाहेब दरेकर, अध्यक्ष अमोल हरगुडे, समिती सदस्य महेंद्र दरेकर, प्रल्हाद दरेकर, उत्तम साठे, अमोल पंडित, प्रमोद गाडे यांच्या सह व्यवस्थापन सदस्य उपस्थित होते.