पुणे : नुकताच राज्याच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला आहे. यामध्ये महायुतीने दणदणीत विजय मिळवला तर महाविकास आघाडीला मात्र पराभवाला सामोरं जावं लागलं. निकालानंतर महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी ईव्हीएमवर आक्षेप घेत मत पडताळणीसाठी दाखल अर्ज केला आहे. अशातच बारामतीतून युगेंद्र पवार यांनी देखील मतपडताळणीसाठी अर्ज दाखल केला असल्याचं सांगण्यात येत आहे.
युगेंद्र पवारांचा मतमोजणीवर आक्षेप..
युगेंद्र पवार यांनी मतमोजणीवर आक्षेप घेतला आहे. बारामतीत अजित पवार यांनी युगेंद्र पवार यांचा पराभव केला. या पराभवानंतर युगेंद्र पवार यांनी मतपडताळणीसाठी अर्ज भरला आहे. अजित पवार यांच्या विरोधात बारामती विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटाकडून पुतणे युगेंद्र पवार हे निवडणुकीच्या रिंगणात होते. या लढतीत त्यांचा पराभव झाला आहे. त्यानंतर आता मतमोजणी प्रक्रियेवर युगेंद्र पवार यांनी आक्षेप घेत मतपडताळणी अर्ज केला. आजपासून युगेंद्र पवार यांनी बारामती मतदारसंघात आभार दौरा सुरू केला आहे. त्यांनी सुरुवात बारामती तालुक्यातील काटेवाडी येथून केली आहे. त्यावेळी त्यांनी याबद्दल माहिती दिली.