Saturday, October 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे हादरले! किरकटवाडीत तरुणावर कोयत्याने तब्बल ७१ वेळा वार, पहा रक्तरंजित घटनेचा थरारक व्हिडिओ

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 5 September 2024, 17:20
Raigad police arrested couple for murdering old man shrivardhan

पुणे: नाना पेठेतील माजी नगरसेवक वनराज आंदेकर, हडपसरमधील वासुदेव कुलकर्णी यांच्या खुनामुळे शहरातील वातावरण संवेदनशील बनले असतानाच गुलटेकडीतील डायस प्लॉट परिसरात मंगळवारी (दि. ३) मध्यरात्री कोयत्याने वार करून तरुणाचा निघृण खून करण्यात आला, त्यापाठोपाठ किरकटवाडी परिसरात बुधवारी (दि. ४) सकाळी पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर कोयत्याचे तब्बल ७१ वार केल्याच्या रक्तरंजित घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

किरकटवाडीमध्ये बुधवारी सकाळी पूर्ववैमनस्यातून दोघा तरुणांनी एकावर कोयत्याचे तब्बल ७१ वार केले. त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सागर चव्हाण (वय २८) याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मित्राच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हा निघृण हल्ला केला व त्याला इंस्टाग्रामवर मुलीचे अकाउंट तयार करून सापळ्यात अडकवल्याची धक्कादायक माहिती तपासात पुढे आली आहे.

कोथरूडमधील डहाणूकर कॉलनीमध्ये मे महिन्यात शुल्लक कारणावरून दोन टोळक्यांमध्ये झालेल्या भांडणातून श्रीनिवास वतसलवार (वय २४) याचा निघृण खून करण्यात आला. त्यामध्ये सागर चव्हाण आरोपी होता. या खुनाचा बदला घेण्यासाठी श्रीनिवासाच्या मित्रांनी इंस्टाग्राम अकाऊंटच्या सहाय्याने सापळा रचला. त्यांनी एका मुलीच्या नावाने बनावट अकाउंट तयार करून चव्हाण याच्याशी संपर्क साधला. आरोपी गेले महिनाभर सागर याच्याशी त्या अकाऊंटवरून चॅटिंग करत होते. तो पूर्ण सापळ्यात अडकल्यावर आरोपींनी बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास त्याला किरकटवाडी फाटा परिसरात भेटायला बोलावले.

मुलीला भेटायचे असल्याचे समजून सागर तेथे गेला. त्या वेळी दबा धरून बसलेल्या दोघा आरोपींनी त्याच्यावर हल्ला चढवला. ऐन वर्दळीच्या वेळी भररस्त्यावर झालेल्या या हल्ल्याने नागरिक भयभीत झाले. कोयत्याचे वार वर्मी बसून सागर जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. ही माहिती समजल्यावर स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सागरला तातडीने रुग्णालयात दाखल केले. गंभीर गुन्ह्याची माहिती समजल्यावर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतल. सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने तपास जारी करण्यात आला आहे.

 

वनराज आंदेकर च्या खूनानंतर पुण्यातील ही चौथी घटना…एकमेकांचा काटा काढण्यासाठी गुन्हेगार कोयते, पिस्तूल घेऊन रस्त्यावर उतरत आहेत. #pune #Punecrime pic.twitter.com/5aglLMAVOv

— Yogesh Kangude (@Yogesh_Kangude) September 5, 2024

;

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

एमआयटी कॉलेजमध्ये गेली अन् अचानक गायब! लोणी काळभोर येथील 20 वर्षीय विद्यार्थिनी बेपत्ता

Saturday, 24 October 2026, 10:28

इथेनॉल बनवण्यावर निर्बंध अन् साखर कारखान्यांसमोर संकट! ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत

Saturday, 24 October 2026, 9:56

कुरकुंडी फाट्यावर भरधाव कारने विद्यार्थिनींच्या घोळक्याला उडवलं; एकीचा मृत्यू; 5 जण जखमी

Saturday, 24 October 2026, 9:15

घाटात सडलेल्या अवस्थेत मृतदेह, तपासाची चक्रं फिरली अन् घरातील गुपित आलं समोर; 32 वर्षीय तरुणाच्या खुनामागचं गूढ अखेर उकललं

Saturday, 24 October 2026, 9:01

व्हिडिओ डिलीट करायला का सांगितलं? राग अनावर अन् नववीतील विद्यार्थ्याने शाळेतच विद्यार्थिनीवर केले चाकूने सपासप वार; पुण्यातील घटना

Saturday, 24 October 2026, 8:29

राणा सूर्यवंशींवरील गोळीबारामागे वेगळाच अँगल? रोहित पवार आक्रमक; 360 अंशातून तपासाची केली मागणी

Saturday, 24 October 2026, 8:08
Next Post
EPFO pensioners to get payments from any bank or branch

देशातील कोणत्याही बँकेतून पेन्शन घेता येणार, ७८ लाख पेन्शनधारकांना होणार फायदा; जानेवारीपासून होणार अंमलबजावणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp