Saturday, October 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

घाटात सडलेल्या अवस्थेत मृतदेह, तपासाची चक्रं फिरली अन् घरातील गुपित आलं समोर; 32 वर्षीय तरुणाच्या खुनामागचं गूढ अखेर उकललं

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 24 October 2026, 9:01

सातारा: सातारा आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवरील सोनसळ घाटात 32 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा कराड तालुका पोलिसांनी अवघ्या 24 तासांत छडा लावला. धक्कादायक बाब म्हणजे, या तरुणाच्या हत्येप्रकरणी त्याचे आई-वडील आणि सख्ख्या भावाला अटक करण्यात आली आहे.

मृत तरुणाचे नाव धनाजी आदलिंगे असे असून, 20 ऑक्टोबर रोजी सोनसळ घाटात त्याचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. सुरुवातीला हा अनैसर्गिक मृत्यू असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. शवविच्छेदन अहवालात धनाजीच्या डोक्याला गंभीर मार लागल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला वेग दिला.

पोलिसांनी गोपनीय माहिती आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली. त्यानंतर या प्रकरणात धनाजीच्या कुटुंबातील सदस्यांचा सहभाग असल्याचे समोर आले.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, धनाजीला दारूचे व्यसन होते. तो मद्यपान करून घरी आल्यानंतर कुटुंबीयांशी वाद घालत असल्याचे सांगितले जाते. 15 ऑक्टोबर रोजीही तो दारू पिऊन घरी आला आणि भांडण करू लागला. त्यावेळी झालेल्या वादातून त्याच्या डोक्यावर लाकडी स्टुलने वार करण्यात आल्याचा आरोप आहे. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो भाजी वाहून नेणाऱ्या व्हॅनमधून सोनसळ घाटात नेऊन टाकल्याचा आरोप आहे. या प्रकरणी वडील सत्यवान आदलिंगे, आई सुरेखा आदलिंगे आणि भाऊ लक्ष्मण आदलिंगे या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

कुरकुंडी फाट्यावर भरधाव कारने विद्यार्थिनींच्या घोळक्याला उडवलं; एकीचा मृत्यू; 5 जण जखमी

Saturday, 24 October 2026, 9:15

घाटात सडलेल्या अवस्थेत मृतदेह, तपासाची चक्रं फिरली अन् घरातील गुपित आलं समोर; 32 वर्षीय तरुणाच्या खुनामागचं गूढ अखेर उकललं

Saturday, 24 October 2026, 9:01

व्हिडिओ डिलीट करायला का सांगितलं? राग अनावर अन् नववीतील विद्यार्थ्याने शाळेतच विद्यार्थिनीवर केले चाकूने सपासप वार; पुण्यातील घटना

Saturday, 24 October 2026, 8:29

राणा सूर्यवंशींवरील गोळीबारामागे वेगळाच अँगल? रोहित पवार आक्रमक; 360 अंशातून तपासाची केली मागणी

Saturday, 24 October 2026, 8:08

Maharashtra Weather: मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रात कसे असणार हवामान? पाऊस की कडक ऊन, जाणून घ्या अपडेट

Saturday, 24 October 2026, 7:53

Daily Horoscope: आज शनिदेव कोणावर प्रसन्न? नोकरी, व्यवसाय अन् पैशांचं गणित बदलणार; आजचं राशिभविष्य नक्की वाचा

Saturday, 24 October 2026, 7:38
Next Post

कुरकुंडी फाट्यावर भरधाव कारने विद्यार्थिनींच्या घोळक्याला उडवलं; एकीचा मृत्यू; 5 जण जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp