पुणे : एकाच ठिकाणी काम करत असताना प्रेमसंबंध निर्माण झाल्यानंतर तरुणाने लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर लैंगिक अत्याचार केले. यानंतर तरुणाने लग्न करण्यास नकार दिला. याप्रकरणी एका तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून उत्तर प्रदेशातील तरुणावर हडपसर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जानेवारी 2021 ते मे 2023 या कालावधीत हडपसरमधील मगरपट्टा परिसरात घडला आहे. या प्रकरणी एका 34 वर्षीय तरुणीने बुधवार एक मे रोजी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गौरव अशोक कौशल (व-30 रा. सी.एच.सी, रुदौली, फैजाबाद, उत्तर प्रदेश) याच्यावर भादंवि कलम 376, 376/2/एन नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोबत काम करत असताना आरोपीने तरुणीसोबत जवळीक साधत प्रेमसंबंध निर्माण केले. त्यानंतर तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. यानंतर मात्र आरोपीने गौरव लग्न करण्यास नकार दिल्याने पीडित तरुणीने राष्ट्रीय महिला आयोगाकडे अर्ज केला होता. त्या अनुषंगाने हडपसर पोलिसांनी तरुणीचा जबाब नोंदवत गौरव कौशल याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.