शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी घडली आहे. पवन सुरेश काळे (वय-१९, रा. तळेगाव रोड, शिक्रापूर, ता. शिरूर, मूळ रा. बडून, ता. खटाव, जि. सातारा) असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. याबाबत राजाराम चाळासाहेब राऊत (वय-४१, रा. तळेगाव रोड, शिक्रापूर, ता. शिरूर) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्रापूर येथील तळेगाव रोडवर स्वामी समर्थ मंदिराजवळ राहणारा पवन काळे हा घरात असताना बराच वेळ दरवाजा उघडत नसल्याने त्याला शेजारच्यांनी आवाज दिला. मात्र आतून प्रतिसाद येत नसल्याने शेजारील नागरिकांनी घरात पाहिले असता घरामध्ये पवन याने गळफास घेतल्याचे दिसून आले. दरम्यान पवन काळे याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.