राजेंद्रकुमार शेळके
Youth Climate Warriors : जुन्नर : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या कॉलेज ऑफ फार्मसी, हडपसर महाविद्यालयात ‘युथ क्लायमेट वॉरियर कॅम्पेन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून युथ क्लाइमेट वॉरियरच्या अध्यक्ष वंदना चव्हाण, खासदार प्रो. रुशाल हिना, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष विक्रम जाधव, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष अमोल जाधव, अण्णासाहेब मगर महाविद्यालय तसेच प्राचार्य डॉ. अश्विनी शेवाळे, संचालक सचिन भारद्वाज, महात्मा फुले इन्स्टिट्यूट हे उपस्थित होते.
या वेळी वंदनाताई चव्हाण यांनी प्राचार्या डॉ. अश्विनी शेवाळे यांचे पीएचडी झाल्याबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यार्थ्यांनी जागतिक पातळीवर विचार करावा पण कृती स्वतःपासून करावी, असा संदेश विद्यार्थ्यांना दिला. तसेच प्रा. रुशाल यांनी पर्यावरणापासून होणारा त्रास आपण कसा कमी करू शकतो, यावर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अश्विनी भोसले व प्रा. शितल बोरस्ते यांनी केले. आभार महात्मा फुले इन्स्टिट्यूटचे संचालक सचिन भारद्वाज यांनी मानले.