शिक्रापूर : पाबळ (ता. शिरुर) येथील दत्तात्रय चौधरी हे झाडाखाली झोपलेले असताना निलेश शेलार हा युवक दत्तात्रय यांच्या खिशातील मोबाईल चोरत असताना शेजारील युवकाने दत्तात्रय यांना आवाज दिल्याने त्यांनी निलेश यास चोरीस प्रतिकार केला. दरम्यान, निलेश याने दत्तात्रय यांच्याशी झटापट करुन शेजारील दगडाने मारहाण करत गंभीर जखमी केले.
या घटनेत दत्तात्रय चौधरी (रा. पाबळ ता. शिरुर) हे जखमी झाले असल्याने याबाबत महेश दत्तात्रय चौधरी (वय २५ रा. पाबळ) यांनी शिक्रापूर पोलिसांत फिर्याद दिली.