पुणे : पुण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाने घरामध्ये केअर टेकर म्हणून काम करणाऱ्या एका तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. एवढचं नाही तर याबाबत कोणाला काही सांगितले तर जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार एप्रिल 2024 ते 11 मे 2024 या कालावधीत खडकवासला धरण परिसरातील लॉजमध्ये आणि आरोपीच्या घरात वारंवार घडला आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
याबाबत 24 वर्षीय तरुणीने (सध्या, रा. पुणे, मुळ रा. अहमदनगर) सोमवारी (दि.13) स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून प्रविण बंब (वय-45 रा. लालबाग सोसायटी, मार्केटयार्ड रोड पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्यामाहिती नुसार, आरोपी प्रविण बंब बांधकाम व्यावसायिक आहे, तसेच तो शेअर मार्केटचे देखील काम करतो. आरोपीची आई आजारी असल्याने ती घरात बेडवर पडून आहे. तिची देखभाल करण्यासाठी पीडित तरुणी केअर टेकर म्हणून काम करते. त्यावेळी आरोपीने वेळोवेळी तिच्यासोबत अश्लील वर्तन केले. तसेच तिला जबरदस्तीने बेडरुममध्ये घेऊन जात शारीरिक संबंध ठेवले. याबाबत कोणाला काही सांगितले तर गळा दाबून मारुन टाकण्याची धमकी देखील आरोपीने दिली.
आरोपीने पीडित तरुणीला फिरायला चल अशी विचारणा केली असता तरुणीने त्याला नकार दिला. त्यावेळी त्याने मारून टाकण्याची धमकी देऊन जबरदस्तीने गाडीत बसवले. तिला लॉजमध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच तिला मारहाण करुन बिअर पाजून पुन्हा अत्याचार करुन याबाबत कोणाला काहा सांगितले तर जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्य़ादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.