-बापू मुळीक
सासवड : जिजामाता हायस्कूल जेजुरी विद्यालयातील कला शिक्षक योगेश शंकर घोरपडे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कार्यकारी समिती पुणे जिल्हा, यांच्या वतीने दिला जाणारा तसेच छत्रपती राजश्री शाहू महाराज जयंती महोत्सवानिमित्त आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
यावेळी राहुल मोरे (उपायुक्त महिला व बालकल्याण महाराष्ट्र शासन), रवींद्र चव्हाण (संचालक यशदा व बार्टी महाराष्ट्र शासन) व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कार्यकारी समितीचे अध्यक्ष भीमराव धिवार, सचिव शिशुपाल यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
योगेश घोरपडे हे उपक्रमशील, विद्यार्थीप्रिय, शिक्षक आहेत. त्यांना राष्ट्रीय पुरस्कार दिल्ली, आंतरराष्ट्रीय पुरस्कार काठमांडू नेपाळ या पुरस्काराने प्राप्त शिक्षक आहेत. तसेच ते पुरंदर तालुका कलाशिक्षक संघटनेचे अध्यक्ष या पदावर काम करीत आहेत. त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, सासवड या संस्थेच्या अध्यक्षा आनंदी जगताप, सचिव आमदार संजय जगताप, संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक सनदी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप, संस्थेचे संस्थापक सचिव डॉ.एम.एस.जाधव, सहसचिव दत्तात्रय गवळी, व्यवस्थापक कानिफनाथ अमराळे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव व जिजामाता संकुलाचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर यांनी त्यांचे अभिनंदन केले.