Yawat News : यवत : दौंड येथील निस्वार्थ कर्म व वासटॅक मल्टीस्पोर्ट फाउंडेशनच्या वतीने दौंड शहराजवळील गोपाळवाडी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात १०० हून अधिक महिलांनी नाव नोंदणी केली असून, या शिबिरामध्ये १३ प्रकारच्या चाचण्या मोफत करण्यात आल्या.
१३ प्रकारच्या चाचण्या मोफत
या वेळी गोपाळवाडीचे सरपंच जयसिंग दरेकर, सोसायटीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब गिरमे, पत्रकार विठ्ठल होले, महाराष्ट्र भूमीचे संपादक आनंदा बारवकर, अमीर शेख, माजी उपसरपंच सूरज भुजबळ, पोलीस पाटील वर्षा लोणकर, ग्रामपंचायत सदस्य शरद होले, सोसायटीच्या उपाध्यक्ष शालन टेकवडे, जीवन डोंगरे, संदीप होले, संतोष गिरमे, लखन शेंडे, विजय रंधवे, नाना होले, बाळा डोंगरे, राजू माने यांसह अनेक मान्यवरांनी मोफत आरोग्य तपासणी शिबिरास भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
आरोग्य तपासणी शिबिरात संपूर्ण गावातील महिलांनी सहभाग नोंदवला. या शिबिरासाठी आशा सेविका सोनाली तरटे, आशा देशमुख, आचल पवार, पपीता डोंगरे, मंदा बंडगर, आशा भागवत तर अंगणवाडी सेविका अंजना झुरुंगे, त्रिवेणी झुरुंगे, मोहिनी रायकर, विजया होले, प्रेम घोगरे, साईबाबू पाडे यांनी मोलाची सहकार्य केले.
आरोग्य शिबिर पार पाडण्यासाठी निस्वार्थ कर्म फाउंडेशनच्या विश्वस्त अश्विनी होले यांचा सिंहाचा वाटा होता. या वेळी अमोल वाघमारे व दीपाली वाघमारे यांनी सर्व तपासण्या केल्याची माहिती निस्वार्थ क्रम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व शिबिराचे आयोजक प्रविण होले यांनी दिली.