Yawat News : यवत : दौंड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, यवत स्टेशन येथे गोपाळकाल्याच्या निमित्ताने दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतील विद्यार्थी श्रीकृष्ण, गोविंदा व गोपिका यांची वेशभूषा करून आले होते. या वेळी विद्यार्थ्यांचे विविध खेळ घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध नृत्यप्रकार सादर केले.
विविध नृत्यप्रकार सादर
या वेळी बोलताना शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री रायकर यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना आपले पारंपारिक सण व उत्सव यांचे महत्त्व पटावे, म्हणून विविध उपक्रमांचे आयोजन शाळेमध्ये केले जाते. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.
याप्रसंगी केंद्रप्रमुख प्रणयकुमार पवार, मुख्याध्यापिका जयश्री रायकर, संगिता टिळेकर, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा दीपाली थोरात, शिक्षक रामहरी लावंड, संगीता वाळके आदी पदाधिकारी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दौंड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील या उपक्रमाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.