राहुलकुमार अवचट

Yavat : यवत पोलीस स्टेशन हद्दीतील नांदुर – खामगाव येथील पवार अँग्रो समोरील वनखात्याचे जागेत ओढयाचे कडेला लैली मच्छिंद्र गुडदावत (रा.नांदूर, ता. दौंड जि. पुणे ) ही बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारू विक्री करीत असल्याबाबत यवत पोलीस ठाण्यामध्ये ६ गुन्हे दाखल असूनही हातभट्टीची दारू गाळून विक्री करण्याचे काम चालुच ठेवत असल्याने परीसरातील गुन्हेगारी कृत्यांना आळा घालणे तसेच सार्वजनीक सुव्यवस्था व नागरीकांचे आरोग्याचे दृष्टीकोनातुन प्रभावी प्रतीबंधक कारवाई करणे अत्यंत आवश्यक असल्याने लैली मच्छिंद्र गुडदावत या महिलेवर महाराष्ट्र हातभट्टीवाले, औषधीद्रव्यविषयक विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत असलेल्या कायद्याअंतर्गत पुणे जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून लैली मच्छिंद्र गुडदावत या महिलेस १ वर्षाकरीता स्थानबध्द करून मध्यवर्ती कारागृह, नागपुर येथे ठेवण्यात आलेले आहे.
सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, पोलीस उपनिरीक्षक मारोती मेतलवाड, पोलिस हवालदार महेंद्र चांदणे, राम जगताप, नारायण वलेकर, प्रमोद गायकवाड, रविंद्र मोहिते, गुरूनाथ जगताप,अमोल भुजबळ, किरण तुपे, मोहन भानवसे यांच्या पथकाने केली.







