यवत : यवत येथील चोभेमळा परिसरात गावठी हातभट्टीवर यवत पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी 500 लिटरच्या 10 प्लास्टिकच्या बॅरलमधून 5 हजार लिटरचे कच्चे रसायन, गूळ, झाडाची साली, भिजवलेली पोती यासह एकूण 1 लाख 82 हजारांचा मुद्देमाल आढळून आला.
यवत गावच्या हद्दीतील चोभेमळा येथे कालव्याच्या कडेला एकजण गावठी हातभट्टी चालवत असल्याची माहिती यवत पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने चोभेमळा येथे गावठी दारू बनवत असलेल्या ठिकाणी छापा टाकला असता नरेंद्र मस्ताराम पवार (वय 23 रा.वाखारी, ता.दौंड, जि. पुणे) हा 500 लिटरच्या 10 प्लास्टिकचे बॅरलमध्ये 5 हजार लिटरचे कच्चे रसायन, नवसागर- विवे, गूळ, झाडाची साली, भिजवलेली पोती, असे विषारी मिश्रण तसेच गावठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारा 10 किलो वजनाचा 100 गुळाचे ढेप असा एकूण 1000 किलोचा गूळ, एक दुचाकी, पाण्याची मोटार असा एकूण 1 लाख 82 हजारांचा मुद्देमाल आढळून आला. आरोपी नरेंद्र मस्ताराम पवार याच्या विरोधात यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, पोलीस उपनिरीक्षक आकाश शेळके, पोलीस हवालदार गुरू गायकवाड, महेंद्र चांदणे, रामदास जगताप, अक्षय यादव, मेघराज जगताप, पोलीस शिपाई मारूती बाराते यांच्या पथकाने केली.