यवत: यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत गावठी हातभट्टींवर छापा टाकण्याचे सत्र सुरूच आहे. यवत, पिंपळगाव आणि खोर येथील हातभट्टी चालकांवर कारवाई केल्यानंतर बुधवारी सायंकाळच्या सुमारास डाळिंब गावच्या हद्दीतील रेल्वे पुलाजवळ गावठी हातभट्टी बनवत असलेल्या ठिकाणी यवत पोलीसांची छापा टाकून कारवाई केली. या प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले.
सवालसिंग अलसिंग राठोड (रा. डाळिंब राठोड वस्ती, ता. दौंड) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडे ३ हजार लिटर कच्चे रसायन व साधने असा एकुण ६२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल आढळून आला. याप्रकरणी पोलीस हवालदार अक्षय यादव यांच्या फिर्यादीवरून आरोपी सवालसिंग राठोड याच्याविरुद्ध विरूध्द यवत पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास यवत पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार करचे हे करत आहेत.