यवत: संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी लवकरच सुरू होत असून त्या अनुषंगाने यवत पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या राजकीय दृष्ट्या महत्वाच्या गावांमध्ये यवत पोलीसांकडुन पथसंचलन करण्यात आले.
आज यवत पोलीसांच्या वतीने सायंकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत आगामी लोकसभा निवडणुक कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता निर्भय व शांततामय वातावरणात निवडणूक पार पडावी, या करीता दौंड तालुक्यातील पश्चिम भागातील यवत, केडगाव, वरवंड, पाटस या राजकीयदृष्ट्या संवेदनशील गावांमध्ये पोलिसांनी पथसंचलन केले. सदर पथ संचलनास १ पोलीस निरीक्षक, १ सहा. पोलीस निरीक्षक, ४ पोलीस उपनिरीक्षक, २० पोलीस अंमलदार व ३४ सीआयएसएफ कंपनीचे अंमलदार सहभागी होते. सदर पथसंचलन पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, बारामती विभाग अपर पोलीस अधिक्षक संजय जाधव, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या नेतृत्वाखाली यवत पोलीस स्टेशनकडून करण्यात आले.