यवत : यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावठी हातभट्टींवरील छापा टाकण्याचे सत्र जोमाने सुरू असून, यवत, पिंपळगाव, खोर, डाळिंब येथील हातभट्टी चालकांवर कारवाई केल्यानंतर आज (दि.१४) दहिटणे गावच्या हद्दीतील ओढ्याच्या कडेला गावठी हातभट्टी बनवत असलेल्या ठिकाणी यवत पोलिसांची छापा टाकून कारवाई केली.
यामध्ये ११ हजार लिटर कच्चे रसायन व १०५ लिटर तयार गावठी हातभट्टी असा एकूण २ लाख ९० हजार ७५० रूपये किंमतीच्या मुद्देमालासह भट्टी चालवत असल्याचे आढळून आले असून, याबाबत रामभाऊ संपत शेखावत (वय ५५ रा. कुसेगाव), प्रकाश पुनमचंद गुडदावत (वय २३), बिरता नंदराज बिरावत (वय २२), प्रिय प्रकाश बिरावत (वय २३, तिघेही रा. देवकरवाडी ता.दौंड जि.पुणे) यांच्याविरुद्ध यवत पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली असून, याबाबत पुढील तपास यवत पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस करत आहेत.
ही कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव, यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार निलेश कदम, गुरु गायकवाड, महेंद्र चांदणे, रामदास जगताप, अक्षय यादव, संतोष कदम, सोनल शिंदे, सुवर्णा गायकवाड यांच्या पथकाने केली.