राहुलकुमार अवचट
Yavat News : यवत : जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा गुरुवार दि. १५ रोजी दौंड तालुक्यात प्रवेश करणार आहे. पालखी सोहळा व वारकऱ्यांच्या स्वागतासाठी यवत व वरवंड जय्यत तयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहीती प्रशासनाच्या वतीने दिली जात आहे. (Yavatnagari is ready to welcome Saint Shri Tukaram Maharaj Palkhi ceremony)
तालुक्यात पालखी सोहळ्याचा दोन दिवस मुक्काम असून पहिला मुक्काम यवत तर दुसरा मुक्काम वरवंड या ठिकाणी आहे. सायंकाळी चारच्या सुमारास दौंड तालुक्याच्या सीमेवर पालखी रथाचे आगमन मोठ्या जल्लोषात होत असते.
श्री काळभैरवनाथ मंदिरात पालखीचा मुक्काम
यवत येथील श्री काळभैरवनाथ मंदिरात पालखी मुक्कामी असून तालुका प्रशासनाबरोबरच यवत ग्रामपंचायत प्रशासन आणि संपूर्ण ग्रामस्थ पालखी सोहळ्याच्या तयारीत गुंतलेले आहेत. (Yavat News) ग्रामस्थांकडून पालखी सोहळ्यासाठी दरवर्षी पिठलं -भाकरी जेवणाची व्यवस्था केली जात असून त्याची व्यवस्था पूर्ण झाली आहे.
शाळेच्या मैदानात, गुंड मैदान, दोरगेवाडी, यवत स्टेशन आधी परिसरात दिंड्या आपला मुक्काम करत असल्याने जागांची स्वच्छता, दिवाबत्तीची सोय याबरोबरच १००० मोबाईल टॉयलेटची व्यवस्था, श्री काळभैरवनाथ मंदिर परिसरात एकाचवेळी ३०० मोबाईल चार्जिंगच्या सुविधा, शाम पवार, सोनाबा कुदळे, (Yavat News) रमेश बनसोडे यांच्या विहिरीवरून मोफत टँकर भरण्याची व्यवस्था,परिसरातील सर्वच विहिरीमध्ये टी सी एल टाकून पाणी शुध्दीकरण, आवश्यक त्या ठिकाणी कचरा कुंड्याची व्यवस्था, मंदिर व शाळा परिसरात एकाच वेळी १ हजार भाविकांच्या स्नानांची सोय ,
महिलांसाठी विविध सुविधा,
हरीत वारीच्या अनुषंगाने गावाच्या परिसरात दोनशे झाडे लावण्याचे नियोजन , पालखी रस्ता आणि प्रदिक्षणा मार्ग परिसरात विद्युतीकरण, विद्युत रोषणाई , आदी सुविधा ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्या आहेत तर दिंड्यासाठी रॉकेल व गॅस गँसची सोय स्वस्त धान्य दुकानात करण्यात आली आहे.
कालभैरवाथ मंदिराजवळ नियंत्रण कक्ष व पंचायत समिती कडून आरोग्यकक्ष उभारण्यात येत आहे. पंचायत समिती अधिकारी,कर्मचारी, तसेच आरोग्य विभागाकडून मोठ्या प्रमाणावर डॉक्टर,आरोग्य सेवक-सेविका,आरोग्य कर्मचारी, ऍम्ब्युलन्स यांची देखील तयारी करण्यात आली असल्याची माहिती यवतचे सरपंच समीर दोरगे आणि ग्रामविकास अधिकारी चखाले यांनी दिली.
पालखी दोन दिवस दौंड तालुक्यात असल्याने यवत पोलीस प्रशासनाने यवत आणि वरवंड आणि दौंड तालुक्याचे हद्दीपर्यंत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दोन दिवस पोलिसांची कडेकोट बंदोबस्त असतो.
पालखी सोहळ्या सोबत असणाऱ्या वारकरी आणि भाविकांना कोणत्याही प्रकारच्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या अडचण येणार नाही, कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी यवत पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून पालखी सोहळ्याच्या बंदोबस्त साठी यवत पोलीस ठाणे आणि प्रशासन सज्ज झाले (Yavat News) असून १ सहाय्यक पोलीस अधीक्षक,४ उपविभागीय पोलीस अधिकारी,१२ पोलीस निरीक्षक, ६९ सहाय्यक पोलीस निरीक्षक, ६००हुन अधिक अंमलदार,१०० महिलांसह ६००होमगार्ड, राज्य राखीव दलाच्या २ तुकड्या,२ दंगल नियंत्रक पथके वरवंड येथील ए.सी.दिवेकर महाविद्यालयाचे एनसीसीचे १०० विद्यार्थी,१०० विशेष पोलीस अधिकारी असा सुमारे १५०० हून अधिक पोलीस आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या स्वयंसेवक संस्थेची पथके असा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Yavat News : शोरूममध्ये दुरुस्तीसाठी आलेल्या कारसह १ लाख रुपयांची चोरी
Yavat News : शोरूममध्ये दुरुस्तीसाठी आलेल्या कारसह १ लाख रुपयांची चोरी
Yavat News : खामगाव येथे जमिनीच्या वाटणीवरून एकाला मारहाण , तिघांविरुद्ध गुन्हा दाखल