Yavat News : यवत: सातारा जिल्ह्यातील बोरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत कुरीअर कंपनीच्या गाडी वर दरोडा टाकून मोठ्या प्रमाणावर सोने चांदी चोरून फरारी झालेल्या टोळीला यवत पोलिसांनी बेड्या ठोकल्या. (The police shackled the gang of robbers who escaped after looting gold and silver)
18 किलो चांदी आणि 11 तोळे सोने जप्त
या टोळीकडून आतापर्यंत 18 किलो चांदी आणि 11 तोळे सोने जप्त करण्यात आले तर आणखी चार किलो सोन्यापेक्षा जादा ऐवज घेऊन दोन दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले आहे. (Yavat News) त्यांचा शोध यवत पोलीस व पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी व कर्मचारी घेत आहेत.
सफराज सलीम नदाफ (वय-३४), मारुती लक्ष्मण मिसाळ (वय-३१, दोन्ही रा. कुंभाजे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापुर, सुरज बाजीराव कांबळे (वय २४) करण सायाजी कांबळे (वय २३ वर्ष दोन्ही रा. साव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापुर), गैख सुनिल घाडगे (वय २३, रा. मिनचे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापुर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पुणे–बंगळुरू महामार्गावर सातारा जिल्ह्यातील बोरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोने आणि चांदीच्या विटा घेऊन जाणारे पिकअप गाडी अडवून त्यातील ऐवज घेऊन पसार झालेल्या चार जणांना यवत पोलिसांनी पुणे- सोलापूर महामार्गावर कासूर्डी टोलनाका येथे रविवारी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास अटक केली.(Yavat News)
यवत पोलिसांनी दरोडेखोरांनी वापरलेली इंनोवा गाडी देखील ताब्यात घेतली असून सबंधित सोने व चांदी हे कुरिअर ने घेऊन जात असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून या घटनेमुळे सातारा व पुणे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
यातील अटक करण्यात आलेल्या दरोडेखोर यांनी पाळत राखून हा प्रकार केल्याचे दिसून येत आहे. (Yavat News) यवत पोलिसांच्या कारवाई पथकात पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अविनाश शिळीमकर सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील लोखंडे, केशव वाबळे व इतर कर्मचारी यांनी नाकाबंदी करत ही टोळी जेरबंद केली आहे.
दरम्यान, रविवारी उशिरापर्यंत यवत पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते तर घटनास्थळी सातारा पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते यातील फरारी दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस दलाने श्वान पथकाला देखील पाचारण केले आहे.(Yavat News)
सदरची कामगिरी यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वनिल लोखडे, वाबळे, पोलीस उपनिरीक्षक सिद्ध पाटील, पोलीस हवालदार गणेश कर्चे, राजीव शिंदे, रवींद्र गोसावी, संदिप देवकर, सचिन घाडगे, विजय कांचन, चंद्रकात जाधव, राजु मोमीन, अजय घुले, प्रमोद नवले, अजित इंगवले, नारायण जाधव, नुतन जाधव, दामोदर होळकर, सोमनाथ सुपेकर, सागर क्षीरसागर, तात्याराम को, समिर भालेराव, धिरज जाधव यांच्या पथकाने केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : मुंढव्यात पबमध्ये प्रवेश नाकारल्याच्या रागातून वेटरवर धारदार शस्त्राने वार
Pune News : मोदी सरकार म्हणजे ‘नो डेटा अव्हेलेबल; काँग्रेसच्या नेत्या अनुमा आचार्य यांची टीका