राहुलकुमार अवचट
Yavat News : यवत : दौंड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील नाथाची वाडी येथील शिक्षक सुजित खेडेकर यांना पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कारान प्रदान करण्यात आला.
उत्कृष्ट शैक्षणिक कामकाजाबद्दल व चांगले विद्यार्थी घडविण्याचे कार्य करणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी जिल्हा परिषदेच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. (Yavat News) पुणे जिल्हा परिषदेअंतर्गत दौंड पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून नुकतेच गुणवंत शिक्षक पुरस्काराचे वितरण चौफुला येथील श्रीकृष्ण मंगल कार्यालयात पार पडले.
शिक्षकवृंद आणि नाथाचीवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित
पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून गुणवंत शिक्षक पुरस्काराची यादी प्रसिद्ध केली होती. दौंड तालुक्यातील शिक्षकांना आमदार राहुल कुल यांच्या हस्ते गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. (Yavat News) या वेळी नाथाचीवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक सुजित खेडेकर यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या वेळी दौंडचे आमदार राहुल कुल, युवा नेते तुषार थोरात, पंचायत समितीचे माजी सभापती झुंबर गायकवाड, माजी उपसभापती नितीन दोरगे, गटविकास अधिकारी अजिंक्य येळे, गटशिक्षणाधिकारी संजय महाजन, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापक शरद नातू, (Yavat News) सहशिक्षिका सारिका कुंजीर, सुवर्णा थोरात, तालुक्यातील सर्व शिक्षकवृंद आणि नाथाचीवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
हा पुरस्कार मला मिळणे ही माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी आनंदाची बाब आहे. मला मिळालेला पुरस्कार हा माझे आई-वडील, विद्यार्थी, माझे सहकारी शिक्षक,(Yavat News) नाथाचीवाडीचे ग्रामस्थ, माझे गुरुजन यांच्या सहकार्यामुळेच मिळाल्याने, हा पुरस्कार मी त्यांना समर्पित करतो, असे मत सुजित खेडेकर यांनी व्यक्त केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Yavat News : दुचाकी चोरणाऱ्या सराईतास अटक; १३ गुन्हे उघडकीस
Yavat News : मिरवडी येथे शिक्षकांचा आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान