राहुलकुमार अवचट
Yavat News : यवत : प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील श्रीक्षेत्र डाळिंब बन येथील श्री विठ्ठल मंदिर देवस्थानस पुरंदरचे माजी आमदार स्व. चंदूकाका जगताप यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या ७४ व्या जयंतीचे औचित्य साधून आज शुक्रवारी रोजी पुरंदर- हवेलीचे आमदार संजय चंदूकाका जगताप यांनी ५ लाख रुपयांची देणगी दिली. (Shree Kshetra Dalimb Devasthanam Donation of five lakhs in memory of Chandukaka Jagtap)
स्वर्गीय मा.आमदार चंदुकाका जगताप यांच्या स्मरणार्थ ५ लाख रुपये प्रति पंढरपूर असलेल्या
डाळिंब बन विठ्ठल मंदिर देवस्थान मागील वर्षी आषाढी एकादशीला पूजेसाठी आमदार संजय जगताप व पत्नी राजवर्धनी संजय जगताप आले (Yavat News) असताना याबाबत घोषणा केली होती.
डाळिंब परिसरातील विद्यार्थ्यांसाठी उरुळी कांचनला शाळेत जाण्यासाठी मोफत बससेवा देण्याची घोषणा
आज दिनांक ९ जून रोजी डाळिंब येथील विठ्ठल मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र कांचन व डाळिंब गावचे सरपंच बजरंग म्हस्के यांना ५ लाखांचा धनादेश देण्यात आला. यावेळी सरपंच बजरंग मस्के यांनी केलेल्या मागणीला दाद देत (Yavat News) आमदार संजय जगताप यांनी डाळिंब परिसरातील विद्यार्थ्यांसाठी उरुळी कांचनला शाळेत जाण्यासाठी मोफत बससेवा देण्याची घोषणा केली.
देवस्थानचे उपाध्यक्ष नानासाहेब म्हस्के, सचिव एल.बी.म्हस्के, खजिनदार बाळासाहेब म्हस्के, विश्वस्त विठ्ठल म्हस्के, सभापती श्रीरंग म्हस्के, संचालक लक्ष्मण म्हस्के, ग्रामपंचायत सदस्य सर्जेराव म्हस्के, दौंड विधानसभा काँग्रेस अध्यक्ष विठ्ठल दोरगे, विठोबा खराडे , (Yavat News) सदस्य सागर म्हस्के , ज्ञानदेव म्हस्के, दत्तू म्हस्के, उत्तम म्हस्के, अशोक मारूती गायकवाड वि.का. सोसायटीचे चेअरमन उमेश म्हस्के आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Yavat News : पैशाच्या कारणावरून वरवंड येथे एकाचा खून, आरोपीला तात्काळ ठोकल्या बेड्या