राहुलकुमार अवचट
Yavat News : यवत: जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून भारतीय जैन संघटना यवत शाखेच्या वतीने श्री क्षेत्र भुलेश्वर परिसरात ५० देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
भारतीय जैन संघटना यवत शाखा यांनी हरितवारी फाउंडेशनच्या सहकार्याने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त श्री भुलेश्वर परिसरातील वृक्षरोपण महाअभियान राबविण्यात आले. (Plantation of trees at Bhuleshwar on the occasion of World Environment Day by Jain Association of India Yawat branch)
हरितवारी फाउंडेशनच्या सहकार्याने उपक्रमाचे आयोजन
भारतीय जैन संघटनेचे विभागीय अध्यक्ष सचिन भोगावती, जिल्हाध्यक्ष मनोज पोखरना, जिल्हा उपाध्यक्ष हर्षल भटेवरा यांच्या मार्गदर्शनाखाली, ५ जून विश्व पर्यावरण दिवस ५० देशी झाडांचे वृक्षरोपण करून साजरा करण्यात आला. (Yavat News) गेल्या अनेक वर्षांपासून भुलेश्वर मंदिर परिसर, घाटमाथा, मठ व हनुमान मंदिर परिसर, भुलेश्वर पायथा अशा अनेक ठिकाणी वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करीत असलेल्या हरितवारी फाउंडेशनच्या सहकार्याने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सध्या वाढत्या प्रदूषणामुळे जास्तीत जास्त वृक्ष लागवड होणे आवश्यक असून वृक्ष पर्यावरणचा समतोल अबाधित राहावा या दृष्टिकोनातून अधिकाधिक वृक्षांची लागवड करणे, वृक्षारोपण बाबत जनजागृती होणे आवश्यक असल्याचे मत भारतीय जैन संघटनेचे यवत अध्यक्ष प्रतीक शहा यांनी व्यक्त केले.(Yavat News)
प्रदूषण मुक्त पर्यावरणाची धुरा सांभाळणे हे प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी असून निसर्ग सौंदर्याने नटलेला भुलेश्वर परिसरात जास्तीत जास्त झाडे लावून “झाडे लावा झाडे जगवा” या संज्ञेप्रमाणे अनुकरण करण्याची आवश्यक असल्याची भावना यवत शाखेच्या उपाध्यक्षा काश्मीराबेन मेहता यांनी व्यक्त केली.(Yavat News) यावेळी भारतीय जैन संघटना यवत शाखेचे सचिव नितीन जैन, संजय मेहेर, प्रतीक शहा, शुभम मेहेर,अमोल शहा, यश शहा, रितेश शहा, मयूर शहा, तसेच हरितवारी फाउंडेशनचे नितीन हेंद्रे, राहुल बनसोडे उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Yavat News : मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी घेतला पालखी तयारीचा आढावा