गणेश सुळ
Yavat News : केडगाव : यवत पोलीस स्टेशनच्या अधिपत्याखाली येणाऱ्या सर्व गावांतील विविध तक्रारींचे निवारण शनिवारी (ता. २३) करण्यात येणार आहे. हा उपक्रम यवत पोलीस स्टेशन येथे तक्रार दिनाचे औचित्य साधून राबविण्यात येणार आहे. परिसराच्या लोकसंख्येत वाढ होत असल्याने तक्रार अर्जांचे प्रमाण देखील वाढले आहे. वाद मिटून नागरिकांना लवकरात लवकर न्याय मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविला जातो.
तक्रारदारांनी लाभ घेण्याचे पोलीस निरीक्षकांनी केले आवाहन
येत्या शनिवारी हा उपक्रम राबविण्यात येणार असून, यादिवशी यवत पोलीस स्टेशन हद्दीतील जास्तीत जास्त अर्जदार व गैरअर्जदारांनी हजर राहावे, असे आवाहन यवतचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी केले आहे.
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांच्या तक्रारी येत असतात. अनेकदा तक्रारींचे निवारण करण्यास उशीर होतो. तक्रार निवारण दिनाचे औचित्य साधून, उभय पक्षांना बोलावून त्यांचे म्हणणे ऐकले जाते. यातून वाद न होता काही तोडगा निघतो का, दोन्ही पक्षांमध्ये दिलजमाई होते का, हे पाहिले जाते. (Yavat News) अनेकदा दोन्ही पक्षांना आपापली भूमिका मांडता येते. यामुळे वर्षानुवर्षे सुरु असलेले वाद मिटल्याचे पहायला मिळाले आहे.
याबाबत देलवडीच्या पोलीस पाटील माया अडागळे म्हणाल्या की, यवत पोलीस स्टेशनच्या वतीने २३ सप्टेंबर रोजी तक्रार निवारण दिनाचे आयोजन केले आहे. (Yavat News) याची माहिती आम्ही गावातील सर्व नागरिकांपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहचविली आहे. सर्व तक्रारदारांनी या उपक्रमास उपस्थित राहून, उपक्रमाचा लाभ घ्यावा. विचार विनिमय करून, तक्रारींवर तोडगा काढावा.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Yavat News : यवत परिसरात घरोघरी बाप्पाचे भक्तिमय वातावरणात आगमन