Yavat News : यवत : लोकसभा निवडणुकांसाठी विकासात्मक आणि संघटनात्मक बांधणी मोहिमेचा भाग म्हणून भाजपने लोकसभा प्रवास योजना हा उपक्रम सुरु केला आहे. याचाच एक भाग म्हणून सोमवारी (ता.५) रोजी
बारामती लोकसभा मतदारसंघ लोकसभा प्रवास योजना अंतर्गत लाभार्थी व बूथ प्रमुख मेळाव्याचे चौफुला येथे आयोजन केले आहे. (In Baramati Lok Sabha Constituency Lok Sabha Travel Scheme Beneficiaries and Booth Head Meeting organized at Chauphula)
श्रीकृष्ण मंगल कार्यालयात होणार मेळावा
सकाळी दहा वाजता केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग आणि जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल, सह क्लष्टर प्रमुख संजय टंडन व दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीत (Yavat News ) श्रीकृष्ण मंगल कार्यालय, केडगाव चौफुला येथे लाभार्थी व बूथ प्रमुख मेळावा आयोजित केला असल्याची माहिती भाजपचे दौंड तालुका अध्यक्ष माऊली ताकवणे यांनी दिली आहे.
मेळाव्यासाठी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व बूथ प्रमुखांनी (Yavat News ) आपल्या परीसरातील विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांच्या समवेत उपस्थित राहावे, असे आवाहन माऊली ताकवणे यांनी केले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Yavat News : मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी घेतला पालखी तयारीचा आढावा
Yavat News : संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा परंपरेनुसार भांडगाव गावातच थांबविण्याची मागणी