राहुलकुमार अवचट
Yavat News : यवत : मिरवडी (ता. दौंड) येथे शिक्षकांचा आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन शनिवारी (ता.०९) सन्मान
करण्यात आले आहे. मिरवडी ग्रामपंचायत कार्यालयात शिक्षक दिनाच्या निमित्ताने पुरस्कार वितरणाचे कार्यक्रम सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मिरवडी येथील अंगणवाडी, दोन्ही प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा येथील सर्व शिक्षकांना आदर्श गुणवंत शिक्षक या पुरस्काराने शैक्षणिक कार्यातील विशेष उपक्रम व गुणवत्ता यांबद्दल सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर ग्रामसेवक व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथील वैद्यकीय स्टाफ यांना सामाजिक कार्याबद्दल विशेष सन्मानाने गौरविण्यात आले.
माजी विद्यार्थ्यांनी शाळेला केली आर्थिक मदत
पुरस्कार प्राप्त झालेल्या सर्व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करून या विशेष सन्मान सोहळ्याबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी पालक व ग्रामस्थ यांमधून निलेश फणसे व अतुल शेंडगे यांनी मनोगत व्यक्त केले. (Yavat News) यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सरपंच सागर शेलार यांनी केले
दरम्यान, या कार्यक्रमाच्या निमित्ताने सन २००७-०८ च्या इयत्ता १० वी बॅचच्या वतीने प्राथमिक शाळा मिरवडी यांना भौतिक सुविधांसाठी १० हजार रुपये माजी विद्यार्थी सागर शेलार, अभिजीत धायगुडे, सतीश मलाव, अतुल शेंडगे व बापू मदने यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आली. तसेच पुढील काळात शाळेमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे सर्वांनुमते ठरले आहे.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक बाळासाहेब शिंदे, सरपंच शांताराम थोरात, उपसरपंच कल्याणी कोंडे, माजी सरपंच सागर शेलार, (Yavat News) ग्रामपंचायत सदस्य प्रवीण कांबळे ,शुभांगी शिंदे ,अमित मेमाणे ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किशोर थोरात, सोमनाथ ढवळे, उपाध्यक्ष सतीश मालव, रमेश कांबळे, संतोष भिसे, प्रवीण कांबळे, ज्योती सावंत ,सोनाली कोंडे ,प्रवीण कोंडे यांसह ग्रामस्थ , शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Yavat News : पीएमपीएलचे दैनिक पास उद्यापासून पुन्हा सुरू, ७० ऐवजी १२० रुपये द्यावे लागणार
Yavat News : शेतातून जात असताना दाम्पत्याला चुलत्यासह भावांकडून बेदम मारहाण