राहुलकुमार अवचट
Yavat News : यवत : आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार असून, शिवभक्तांसाठी ही एक पर्वणी असते. यामुळे राज्यभरातून भाविकांनी आज दौंड व पुरंदर तालुक्यांच्या सीमेवर वसलेल्या भुलेश्वर येथे दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.
दर्शनासाठी मध्यरात्रीपासूनच गर्दी
पुणे जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या भुलेश्वर मंदिरात रात्री १२ वाजल्यापासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पहाटे पाचच्या सुमारास शिवलिंगावर रुद्राभिषेक करून महाआरती करण्यात आली. या वेळी शिवलिंगावर आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती. मंदिर परिसरात व प्रवेशद्वारावर फुलांची आरास करण्यात आली होती. (Yavat News) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास श्रींच्या मूर्तीची वाजतगाजत मिरवणुक काढण्यात आली. पाण्याच्या कुंडावर मूर्तीला स्नान घालून, हर हर महादेवच्या गजरात पालखीमध्ये ठेवण्यात आले. गुलाबाची उधळण करत हलगीच्या तालावर, शिवनामाच्या भक्तीत तल्लीन होत, खांद्यावर कावड घेत मानाच्या कावडींनी मंदिराच्या प्रवेशद्वारावर धार घातली.
कावड यात्रेत तरुणांनी मोठ्या प्रमाणात पारंपारिक खेळ खेळत सहभाग घेतला. दर्शनासाठी रांग केल्याने भाविकांनी शांततेत दर्शन घेतले. (Yavat News) या वेळी अनेक भाविक भक्तांकडून फराळाचे वाटप व अन्नदान करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र, माळशिरस यांच्यावतीने आरोग्य कक्ष उभारला होता. मंदिराकडे येणारी वाहने वन विभागाच्या प्रवेशद्वारावरच थांबवण्यात आल्याने मंदिर परिसरात वाहतूक कोंडीतून भाविकांची सुटका झाली. या वेळी वन विभागातून मंदिराकडे येणाऱ्या रस्त्यावर विविध प्रकारची दुकाने थाटली होती.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Yavat News : यवत ग्रामीण रुग्णालयाची कौतुकास्पद कामगिरी; 36 तासांत 13 महिलांची यशस्वी प्रसूती
Yavat News : दरोड्याच्या तयारीत असलेली सराईत टोळी जेरबंद
Yavat News : यवत बस स्थानकावर वेळापत्रक लावण्याची प्रवाशांची मागणी