राहुलकुमार अवचट
Yavat News : यवत : यवत परिसरात पूर्व भागात असलेल्या कुदळेमळाकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ २० फाटा येथे बिबट्याची दहशत पसरली आहे. मागील चार दिवसांपासून परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी बिबट्या पाहिल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी या भागात पिंजरा लावण्यासाठी मागणी करत आहेत.
वनविभागाने पिंजरा लावण्याची मागणी
20 फाटा येथे मोठ्या प्रमाणात ऊस क्षेत्र व जवळच असलेला खडकवासला कालवा पाण्याचा प्रवाह यामुळे बिबट्याला येथे लपण्यासाठी व अधिवासासाठी चांगली जागा उपलब्ध झाली आहे. मात्र, असे असले तरी त्याच्या खाण्याची गरज हे ऊस क्षेत्र भागवू शकत नसल्याने बिबट्यांनी अन्नासाठी परिसरात भटकंती करत असून, गेल्या चार दिवसापासून परिसरात बिबट्या अनेक जणांनी पाहिल्याचे बंटी कांबळे, गिरमे व परिसरातील नागरिक सांगत आहेत. (Yavat News) वन विभागाच्या वनरक्षक यांनी पाहणी केली असून, वरिष्ठ कार्यालयाकडे पिंजराबाबत मागणी केली असल्याची सांगितले.
यवत येथील 20 फाटा परिसरात शेतीसोबत दुग्धोत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते. त्यामुळे पाळीव जनावरांची संख्या मोठी असून, अनेक गाईचे गोटे व लोकवस्ती असून बिबट्याच्या असल्याने परिसरात मोठी दहशत निर्माण झाली आहे. (Yavat News) जिवाच्या भीतीने परिसरातील नागरिक मोठ्या दहशतीखाली असून, अनेक शेतकरी रात्री तर सोडाच परंतु दिवसादेखील बाहेर जाण्यासाठी घाबरत आहेत. हे सावट दूर करणे गरजेचे आहे. यासाठी परिसरात पिंजरा लावण्याची अत्यंत आवश्यकता असल्याची मागणी स्थानिक शेतकरी व शिवसेनेचे अध्यक्ष अशोक दोरगे, धुळा कारंडे, संजय टिळेकर, यांसह परिसरातील शेतकरी करत आहेत.