राहुलकुमार अवचट
Yavat News : यवत : यवत (ता. दौंड) येथील आनंद मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.श्याम कुलकर्णी हे गेल्या ५५ वर्षाहून अधिक काळ आनंद हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्ण सेवा करत आहे. त्याच्या या कार्याची दाखल घेऊन श्री काळभैरवनाथ जेष्ठ नागरिक संघ यांच्या वतीने डॉ. श्याम कुलकर्णी यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
मोफत चर्चासत्राचेही आयोजन
डॉ. श्याम कुलकर्णी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रेशनकार्ड धारकांना महाराष्ट्र शासन व केंद्र सरकार यांच्या माध्यमातुन ५ लाखापर्यंत ठराविक हॉस्पिटल मध्ये मोफत उपचार केले जाणार आहेत. याबाबत नागरीकांना माहिती मिळावी. (Yavat News) यासाठी मोफत चर्चासत्र शिबिराचे आयोजन श्री काळभैरवनाथ मंदिरात करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यवत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब कदम होते.
दरम्यान, सकाळी अकराच्या सुमारास सत्कारमूर्ती डॉ. श्याम कुलकर्णी, यवत चे सरपंच समीर दोरगे, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. बाळासाहेब कदम, आनंदी जीवन फाउंडेशनचे डॉ. पठाण आदी मान्यवरांचे आगमन होताच फटाकड्याची आतिषबाजी व पारंपारिक पद्धतीने सामाजिक कार्यकर्त्या शितल दोरगे यांच्या हस्ते औक्षण करून स्वागत करण्यात आले.
डॉक्टर श्याम कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, श्री काळभैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघ यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला शुभेच्छा देत घरातून मिळणारा सन्मान हा फार मोठा असतो. गेल्या ५५ वर्षाहून अधिक काळ यवत येथे रुग्णसेवक देत असताना आलेले अनेक अनुभव कथन केले तर सध्या महाराष्ट्र शासन व केंद्र शासन यांच्याकडून (Yavat News) महात्मा फुले जन आरोग्य योजना, आभा कार्ड,आयुष्यमान भारत यासारख्या देण्यात येणाऱ्या अनेक योजना बद्दलची माहिती उपस्थित नागरिकांना दिली व जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
याबाबत कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास मी कायमच आपल्याबरोबर असेल अशी ग्वाही दिली व निमित्त सर्वांचे ऋण व्यक्त केले (Yavat News) तसेच लवकरच काश्मीर परिसरात १० दिवसाचा आरोग्य कॅम्प साठी जाणार असल्याची माहिती दिली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Yavat News : पुणे – सोलापूर महामार्ग ओलांडताना दुचाकीने दिलेल्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू
Yavat News : यवत येथे थांबलेल्या एसटीला कार धडकून अपघात; प्रवासी बालंबाल बचावले