Yavat News : यवत : यवत येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात 36 तासांमध्ये 13 महिलांची प्रसूती झाली आहे. यामध्ये 13 बालकांनी जन्म घेतला आहे. यातील सहा महिलांचे सिजेरियन तर सात महिलांची नॉर्मल प्रसूती झाली असल्याची माहिती यवत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बाळासाहेब कदम यांनी दिली आहे.
रुग्णालयात प्रसूतीसाठी अद्यावत शस्त्रक्रिया विभाग तयार
ग्रामीण भागातील प्रसूतीसाठी येणाऱ्या गोरगरीब महिलांची प्रशासनाकडून विशेष काळजी घेतली जात असल्याने अशा मातांची ग्रामीण रुग्णालयात येण्याची संख्या वाढली आहे. त्यांना याठिकाणी चांगली आरोग्य सेवा मिळत आहे. खाजगी दवाखान्यात हजारो रुपयांचे बिल परवडत नसल्याने गरोदर महिलांना पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागत होते. (Yavat News) मात्र, काही महिन्यांपूर्वी यवत येथील शासकिय ग्रामीण रुग्णालयमध्ये गरोदर महिलांना योग्य अशी सुविधा देऊन त्यांची विशेष काळजी घेऊन येथेच प्रसूती व्हावी यासाठी नव्याने रुजू झालेले वैद्यकीय अधीक्षक डॉ. कदम यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.
रुग्णालयात प्रसूतीसाठी अद्यावत शस्त्रक्रिया विभाग तयार करण्यात आला असून, त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. भविष्यात या रूग्णालय परिसरातील (Yavat News) सर्व गावातील गरोदर महिलांना प्रसूतीसाठी या सोयीसुविधेचा फायदा होणार असल्याचे डॉ.कदम यांनी यावेळी सांगितले.
यवत येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयामध्ये 36 तासामध्ये 13 महिलांची यशस्वी प्रसूती होण्यामागे येथे उपलब्ध असलेले डॉक्टरवर्ग, परिचारिका व इतर स्टाफ या सर्वांच्या कौतुकास्पद कामगिरीमुळे सर्वकाही झाले आहे. (Yavat News) आणखी सोयी सुविधा या गरोदर महिलांना मिळाव्यात यासाठी मी नेहमी तत्पर आहे.
– समीर सय्यद, सदस्य, रुग्ण कल्याण समिती.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Yavat News : दरोड्याच्या तयारीत असलेली सराईत टोळी जेरबंद
Yavat News : यवत बस स्थानकावर वेळापत्रक लावण्याची प्रवाशांची मागणी
Yavat News : यवत बस स्थानकावर वेळापत्रक लावण्याची प्रवाशांची मागणी