राहुलकुमार अवचट
Yavat News : यवत : ६० वर्षातून पहिल्यांदाच दौंड कृषी उत्पन्न बाजार समिती वर आपण सत्ता मिळवली आहे. तसेच आपले कार्यकर्ते सर्व लाभार्थी योजना तालुक्याच्या शेवटच्या जनते पर्यंत पोहचवण्यासाठी काम करीत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या पाठबळावर भाजपा दौंड तालुक्यात उभारी घेत आहे, असे प्रतिपादन दौंडचे आमदार राहुल कुल यांनी केले आहे (BJP is building up in Daund taluka with the support of workers – MLA Rahul Kul)
केडगाव चौफ़ुला येथे लाभार्थी व बूथ प्रमुख मेळाव्याचे आयोजन
भारतीय जनता पार्टी, लोकसभा प्रवास योजना अंतर्गत लाभार्थी व बूथ प्रमुख मेळाव्याचे आयोजन केडगाव चौफूला( दौंड) येथे सोमवारी (ता.५) करण्यात आले होते. यावेळी बोलताना आमदार राहुल कुल
यांनी वरील प्रतिपादन मांडले. यावेळी अन्न प्रक्रिया उद्योग आणि जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे, (Yavat News) जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा कांचन कुल आदि मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार राहुल कुल म्हणाले, केंद्र शासन व महाराष्ट्र सरकाकडून जनतेला वेळोवेळी मदत मिळत आहे. कोरोना काळात आपण ५ हजारहुन अधिक रुग्णांना मदत (Yavat News) करण्यात यशस्वी झालो आहोत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून विविध शासकीय योजनां बाबत मदत मिळाली आहे.
केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या साखर कारखान्यासंदर्भातील धोरणामुळे राज्यातील साखर कारखान्यांना १० हजार कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. (Yavat News) असे कुल यांनी सांगितले आहे.
यावेळी बोलताना प्रल्हादसिंग पटेल म्हणाले की, केंद्र सरकार हे मूलभूत पायाभूत सुविधा आज सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या ग्रामीण भागातील शेवटच्या टोकापर्यंत पोहचवण्यास यशस्वी झाले आहे. (Yavat News) तसेच आज केंद्र शासनच्या विविध योजना गोर गरीब जनतेसाठी देण्यात आल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पेतून आज संपूर्ण भारत देशात प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत तब्बल २ कोटी कुटूंबांना हक्काचे घर देण्यात आले. आयुष्यमान भारत योजने अंतर्गत २२ कोटी नागरिकांना आरोग्य विमा संरक्षण देण्यात आले. प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजने मार्फत ८० कोटी गरीब कुटुंबाना मोफत धान्य वाटप करण्यात हे सरकार यशस्वी झाले आहे. शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी मार्फत दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत मिळत आहे.
असे पटेल यांनी सांगितले आहे.
भाजपाचे पिएम मोदी @९ चे सहसंयोजक संजय टंडन म्हणाले की, आपल्या कार्यकर्त्यांच्या पाठबळावर आज भाजपा मोठ्या ताकदीने उभी आहे. (Yavat News) आणी यांचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहेत. शेवटच्या गरीब जनते पर्यंत नरेंद्र मोदी यांनी काम केले आहे. काँग्रेसच्या काळात जे काम झाले नाही ते काम आज नरेंद्र मोदी यांनी केले आहेत. वीज, शिक्षण , आरोग्य, सुविधा देण्यात भाजपा सक्षम बनली असल्याचे संजय टंडन यांनी सांगितले आहे.
यावेळी बाळासाहेब गावडे, रंजन तावरे, नामदेव बारवकर, प्रेमसुख कटारिया, नंदु पवार,तालुकाध्यक्ष माऊली ताकवणे,संचालक विकास शेलार, तुकाराम ताकवणे,धनाजी शेळके,तानाजी दिवेकर ,नीलकंठ शितोळे, उमेश देवकर,जयदीप सोडनवर तसेच विविध योजनांचे लाभार्थी उपस्थित होते.(Yavat News) कार्यक्रमांचे सूत्रसंचालन बापू भागवत यांनी केले. तर दिनेश गडदे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले..
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Yavat News : मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी घेतला पालखी तयारीचा आढावा